गोवा ‘आप’ची नवीन कार्यकारिणी लवकरच
पणजी :
आम आदमी पक्षाने 2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या प्रवासाच्या नवीन टप्प्यासाठी तयारी करत असताना सोमवारी आपली गोवा कार्यकारिणी समिती बरखास्त केली असून लवकरच नवीन कार्यकारिणी समिती स्थापन करणार आहे.
आप दिल्ली आमदार आणि आप गोवा युनिट प्रभारी आतिशी यांनी सोमवारी पक्षाच्या निर्णयाची घोषणा केली आणि सांगितले की गोव्यासाठी नवीन राज्य कार्यकारिणी समितीची “लवकरच पुनर्रचना” केली जाईल.
अलीकडेच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने चांगली कामगिरी करत दोन जागा मिळवल्या. आपच्या उत्कृष्ट ग्राउंडवर्कमुळे बाणावली आणि वेळ्ळी या दोन मतदारसंघात विजय मिळवला.
“पक्षाचा विस्तार लक्षात घेऊन, आम्ही राज्यातील पक्षाच्या सर्व विद्यमान संघटनात्मक संरचना औपचारिकपणे बरखास्त करत आहोत आणि चांगल्या आणि समविचारी लोकांना पक्षात आणण्यासाठी एक नवीन समिती स्थापन करणार आहोत,” आतिशी म्हणाल्या.