‘या’ नेत्यांनी ठोकला काँग्रेसला रामराम?
पणजी (प्रतिनिधी) :
राज्याचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर काँग्रैस पक्षाला रामराम ठोकला आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील काही आमदार पक्षातून बाहेर पडणार असल्याची कुणकुण लागली होती. त्यामध्ये दिगंबर कामत यांचे नाव आघाडीवर होते. आज सकाळपासून काँगैसमधील 6 आमदार ‘नॉट रिचेबल’ होते. दिवसाअखेरीस त्यांनी पक्षत्याग केल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दरम्यान, पक्षविरोधी कार्यवाही केल्याचा ठपका ठेवत काँग्रैसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी मायकल लोबो यांना पक्षनेतेपदावरून तसेच विरोधी पक्षनेतेपदावरून काढून काढले आहे. त्याचप्रमाणे दिगंबर कामत यांनादेखील पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. अशी माहिती गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. त्यामूळे हे दोन्ही नेते पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.
राव यांनी यावेळी बोलताना गोवा भाजपवर निशाना साधला. तसेच आमच्याच माणसांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असे ही ते म्हणाले तसेच काँग्रेस फोडण्यासाठी भाजपने किती पैसा फेकला हे मी सांगू शकत नाही, त्यासाठी मला थोडा वेळ आवश्यक आहे. तेसच भाजप यासाठी काहीही करु शकते असा ही आरोप दिनेश गुंडू राव यांनी केला.
यावेळी राव म्हणाले की, सध्या राष्ट्रीय काँग्रेस या निर्णयापर्यंत आले आहे की मायकल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदावरून उचलबांगडी केली जाणार आहे. तसेच गोवा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामूळे या दोन्ही नेत्यांवर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कारवाई करणार आहे. असे ही ते यावेळी म्हणाले.