google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘या’ कंपनीने केले ‘किराणा’ व्यवसायात मजबूत स्थान

मुंबई :

गेल्या वर्षी व्यवसाय ते ग्राहक किराणा व्यवसायासाठी एंड-टू-एंड सेवांमध्ये प्रवेश केलेले भारतातील मोठ्या ३ पीएल सुविधा पुरवठादारांपैकी एक महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड (एमएलएल) देशात आपले मजबूत स्थान प्रस्थापित करण्यासाठी सक्षम झाली आहे. कंपनीने आज आपले नवीनतम पूर्तता केंद्र सुरू केल्याची घोषणा केलीते देशातील अकरावे आणि हैदराबाद शहरातील तिसरे आहे. कार्यक्षम कारभारासाठी मुख्य आधार असलेल्या तंत्रज्ञानासह नवीन पूर्तता केंद्र विशेषत: किराणा विभागामध्ये जलद व्यापार सक्षम करेल.

अल्पावधीतच एमएलएलने पूर्तता केंद्रेदूध पुरवठा वाहतूकसूक्ष्म-पूर्तता केंद्रे (डार्क स्टोअर्स) आणि लास्ट माईल डिलिव्हरी या त्याच्या एंड-टू-एंड सेवांसह संपूर्ण भारतभर आपली कामकाज क्षमता प्रस्थापित केली आहे. कंपनीने या विभागासाठी जे नेटवर्क तयार केले आहे ते सर्वोत्तम असून मोठ्या प्रमाणात पूर्तता करण्यासाठी सुसज्ज आहे. ही पूर्तता केंद्रे ५ शहरांमध्ये (बंगलोरवायजॅकविजयवाडाहैदराबाद आणि कोलकाता) असून सध्या दररोज ६ लाखांहून अधिक युनिट्स आणि १५००० हून अधिक दालनांमध्ये सेवा देत आहेत.

या विस्तारावर भाष्य करतानामहिंद्रा लॉजिस्टिकचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामप्रवीण स्वामिनाथन म्हणाले, “ग्राहकांच्या मागणीच्या पद्धती बदलत असतानाआम्ही आमची पोहोच सतत वाढवण्यासाठी आमचे नेटवर्क वाढवत आहोत. अत्यावश्यक सेवा ही झपाट्याने वाढणारी श्रेणी आहे आणि ज्या शहरांमध्ये या सेवा उपलब्ध नाहीत अशा शहरांमध्ये आमच्या सुविधा आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सानुकूलिततंत्रज्ञान-प्रणीत उपाय सुविधांदवारे व्यवसाय ते ग्राहक क्षेत्रात सातत्यपूर्ण ग्राहक अनुभव देण्यावर आमचा विश्वास आहे. या वर्षी एप्रिलमध्ये आम्ही अधिग्रहण केलेला आमचा लास्ट माईल लॉजिस्टिक्स ब्रँड “व्हिझार्ड” द्वारे आम्ही अखेरपर्यंत हे कामकाज सुसंगतएकात्मिक करत आहोत.”

या व्यवसाय ते ग्राहक पूर्तता केंद्रांद्वारे एमएलएल १५०० हून अधिक लोकांसाठी रोजगार निर्माण करत आहे. एमएलएल अधिक सर्वसमावेशक होण्याच्या प्रयत्नावर भर देत आहे. कंपनीने देशभरातील गोदामांमध्ये LGBTQ+ समुदायातील तसेच दिव्यांग व्यक्ती आणि कर्मचाऱ्यांना सक्रियपणे काम दिले आहे. त्याचप्रमाणे एमएलएल विविध पार्श्वभूमीतील आणि अनुभव असलेल्या अधिकाधिक महिलांना कामावर घेऊन स्त्री-पुरुष असमानता अंतर भरून काढत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!