google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘दंगल’ मधील छोट्या ‘बबिता’चे निधन

‘दंगल’ चित्रपटात बबिता फोगटची बालपणीची भूमिका साकारणारी मुलगी सुहानी भटनागरचे (Suhani Bhatnagar) निधन झाले आहे. ती फक्त 19 वर्षांची होती. तिच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. ‘दंगल’ सिनेमात आमिर खानची मुलगी असलेल्या छोट्या बबिताची भूमिकेत सुहानी दिसली होती. तिच्या मृत्यूनंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

सुहानी भटनागरच्या संपूर्ण शरीरात फ्लूइड साठले होते, असे सांगितले जाते. काही काळापूर्वी सुहानीचा अपघात झाला होता, यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. उपचारादरम्यान तिने घेतलेल्या औषधांचा तिच्या शरीरावर दुष्परिणाम झाला, तिच्या शरीरात हळूहळू द्रव जमा होऊ लागले. तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सुहानीच्या पार्थिवावर फरिदाबादच्या सेक्टर-15 येथील अजरौंडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुहानी भटनागर ही बॉलिवूडची प्रसिद्ध बालकलाकार होती. ती आमिर खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘दंगल’ (2016) मधील बबिता फोगटच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. तिने अनेक टेलिव्हिजन जाहिरातींमध्येही काम केले आहे.


‘दंगल’ चित्रपटानंतर सुहानीला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या, मात्र तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. तिला तिच्या अभ्यासात लक्ष घालायचे होते. अभिनेत्री 25 नोव्हेंबर 2021 पासून तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सक्रिय नव्हती. मात्र, याआधी तिने अनेकदा तिचे फोटो शेअर केले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!