google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘काय’ म्हटले DHOOM 3 च्या दशकपूर्ती निमित्त अभिषेक बच्चनने…

‘धूम’या चित्रपटाचं नाव ऐकताच डोळ्यासमोर येतात ते अविस्मरणीय बाईक आणि अ‍ॅक्शन सीन्स. एक असा सिनेमा ज्याने पोलीस आणि चोर या शैलीला एक नवी ओळख दिली. अशातच, उत्तम कथा आणि अ‍ॅक्शनने भरपूर असलेल्या अभिषेक बच्चन आणि आमिर खान अभिनीत ‘धूम ३’ चित्रपटाला रिलीज होऊन १० वर्षे पूर्ण झाली आहेत.अभिषेक बच्चनने साकारलेल्या एसीपी जय दीक्षितच्या व्यक्तिरेखेला दर्शकांच्या उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. तसेच, अभिषेक बच्चनसह ‘धूम ३’या सिनेमात आमिर खान, उदय चोप्रा आणि कतरिना कैफ यांनीही महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. चित्रपट प्रदर्शित होऊन १० वर्षे पूर्ण झाले असून, ‘धूम’ने हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे.


2013 मध्ये रिलीज झालेला विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित अ‍ॅक्शनने भरपूर असलेला ‘धूम ३’ चित्रपट सिने रसिकांच्या पसंतीस उतरला. यामध्ये, सर्कसच्या पार्श्‍वभूमीवर, अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा यांचा खलनायक आमिर खानशी झालेला सामना, थ्रिलने परिपूर्ण अ‍ॅक्शन सीन्स, उत्कृष्ट कथा, आणि अभिषेक बच्चन आणि आमिर खान यांमधील उत्तम केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांचा या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला.


‘धूम ३’चे प्रदर्शन होऊन १० वर्षे पूर्ण झाल्याने अभिषेक बच्चनने इंस्टाग्रामवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाला, “Marking १० years today. 🙏🏽🤗”

https://www.instagram.com/p/C1EDSaIIGlI/?igshid=ZWI2YzEzYmMxYg%3D%3D


‘धूम 3’च्या उदंड यशाने आणि फ्रँचायझीने भारतीय चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडली असून, एका दशकानंतरही ‘धूम 3’ प्रेक्षकांच्या मनावर राज करत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!