
मामुटी, यामी गौतम, कार्तिक आर्यन यांना राष्ट्रीय पुरस्कार
७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
भारतीय मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज ( १८ जुलै ) नवी दिल्ली येथे करण्यात आलेली आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सन्मान केला जाणार आहे. कलाकार व तंत्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. भारतात १९५४ पासून राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात झाली होती.
७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, यंदा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘Article 370’ला जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय यामी गौतम यावर्षीची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली असून, बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि सुपरस्टार मामूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, राधेशाम पिपलवा आणि अग्नेलो ब्रांगाझा दिग्दर्शित ‘मोग आसू’ या कोंकणी सिनेमाला उत्कृष्ट कोंकणी, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे.
७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी…
- सर्वोत्कृष्ट चित्रपट ( Best Feature Film ) : Article 370
- सर्वोत्कृष्ट अभिनेता : कार्तिक आर्यन ( चंदू चॅम्पियन ), मामूटी ( ब्रह्मयुगम )
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : यामी गौतम ( आर्टिकल ३७० )
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : राजकुमार पेरियासामी ( अमरन )
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : रोपश्री वरकाडी ( मिथ्या ) आणि सचन नमिदास ( महाराजा )
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: संजय मिश्रा ( भक्षक )
- सर्वोत्कृष्ट चित्रपट Providing Wholesome Entertainment : Kalki 2898 AD
- राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट : कॅप्टन मिलर
- सर्वोत्कृष्ट बालकलाकार : रिद्धिमान बॅनर्जी, तपोमय देब आणि गीताश्री चक्रवर्ती
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : ब्रह्मयुगम (शेहनाद जलाल)
- सर्वोत्कृष्ट पटकथा: पुष्पा २ (सुकुमार)
- सर्वोत्कृष्ट संवाद लेखक: लकी भास्कर ( संवाद लेखक : वेंकी अटलुरी)
- सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन: Kalki 2898 AD
- Best Action Direction : अनल अरासू, महाराजा
- सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट: कमिटी कुर्रोलू
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा : पुष्पा २- दीपाली नूर आणि शीतल शर्मा
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: आर्टिकल ३७०, शाश्वत सचदेव
- सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत: जी.व्ही.प्रकाश, अमरन
- सर्वोत्कृष्ट गीत: मनोज मुंतशीर, मैदान
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: अभय जोधपूरकर, घरत गणपती ( नवसाची गौराई माझी )
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: वैकोम विजयालक्ष्मी
- सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: विजय गांगुली, स्त्री 2
- सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन : मानस चौधरी, भूल भुलैया ३
- सर्वोत्कृष्ट संपादन ( Editing ): आर कलैवन्नन, अमरन
सर्वोत्कृष्ट प्रादेशिक सिनेमे
- सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट: जुईफूल
- सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट: चलचित्र एकोन
- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: श्रीकांत
- सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – मिथ्या
- सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट: Feminichi Fathima
- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी
- सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट: लहरी
- सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट: रायन
- सर्वोत्कृष्ट गढवाली चित्रपट: ढोली
- सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट: कमिटी कुर्रोलू
- सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट – मारन
- सर्वोत्कृष्ट मणिपुरी चित्रपट – सुनीता
- विशेष उल्लेख – ‘कॅप्टन मिलर’साठी धनुष आणि ‘मियाझगन’साठी सुरेन जी
Non-feature categories
- Best Film Critics – संजीव श्रीवास्तव (हिंदी)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आनंद एल राय – स्टॅच्यू ऑफ युनिटी – एकता का प्रतीक (हिंदी)
- सर्वोत्कृष्ट लघुपट (३० मिनिटांपर्यंत) – हमसफर (मराठी) – निर्माते : अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट्स; दिग्दर्शक : अभिजीत अरविंद दळवी
- सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारी सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म – Piplantri : अ टेल ऑफ इको फेमिनिझम (हिंदी, राजस्थानी आणि इंग्रजी) – निर्माते: जॉन्सन्स सूरज फिल्म्स इंटरनॅशनल; दिग्दर्शक : सूरज कुमार






