फहादच्या वाढदिवसानिमित्त ‘भंवर सिंह शेखावत’चे पोस्टर रिलीज
‘पुष्पा 2 द रुल’ ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पाच्या शोधाची सुरुवात करणार्या व्हिडिओसह पुष्पाच्या कारकिर्दीची किकस्टार्ट करून, अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी प्रेक्षकांना एक रोमांचक पोस्टर रिलीज केले. आता फहाद फासिलच्या वाढदिवसाच्या खास दिवशी पुष्पाच्या टीमने चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचे पोस्टर लाँच करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पुष्पराजने प्रेक्षकांच्या मनावर जितके राज्य केले तितकेच फहद फासिल उर्फ भंवर सिंह शेखावतने देखील प्रेक्षकांच्या मनावर खोल छाप सोडली आहे.
फहाद फासिलचा खास दिवस साजरा करताना, टीम पुष्पाने अभिनेत्याला खास शुभेच्छा दिल्या आणि त्याचे एक जबरदस्त पोस्टर शेअर केले.
पुष्पा 2 द रुलचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून यात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती मैथरी मूवी मेकर्स ने केली आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.