‘सत्यप्रेम की कथा’ची जबरदस्त ओपनिंग…
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या ‘सत्यप्रेम की कथा’ ने काल रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग नोंदवली आहे. 29 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना थिएटरकडे यशस्वीरित्या आकर्षित केले आहे, ज्याचा थेट परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस व्यवसायावर झाला आहे कारण चित्रपटाने पहिल्या दिवशी 9.25 कोटींचा अभूतपूर्व कलेक्शन केले आहे.
https://twitter.com/NGEMovies/status/1674657971266293761?s=20
चित्रपटाच्या रिलीजने निश्चितच चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी पाहिली आहे, ज्याने पहिल्या दिवशी 9.25 कोटींच्या कलेक्शनसह चित्रपटाला अनेक मोठ्या चित्रपटांपेक्षा मोठी ओपनिंग दिली आहे. यासह कार्तिक आर्यनने त्याचा करियरची तिसरी सर्वात मोठी ओपनिंग दिली आहे.
तसे, ही फक्त सुरुवात आहे, आणि आज वर्किंग डे असल्या मुळे चित्रपटाच्या व्यवसायात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे, पण पॉसिटीव्ह वर्ड ऑफ माऊथ मुळे, चित्रपट निश्चितपणे शनिवारी पुन्हा उचलून धरेल जे त्याचे यश निश्चित करेल.