गुजरातमध्ये झुलता पूल नदीत कोसळला; 32 जणांचा बुडून मृत्यू
गुजरातमधील मोरबी याठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मच्छु नदीवरील झुलता पूल पाण्यात कोसळला आहे. या दुर्घटनेत अनेकजण पाण्यात पडून जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. झुलता पूल नदीत कोसळल्याची घटना घडताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
या घटनेत 32 जणांचा बुडून मृत्यू माहिती अद्याप समोर आली आहे.. पूल कोसळल्यानंतर प्रशासन स्थानिक लोकांच्या मदतीने नदीत पडलेल्या नागरिकांची सुटका करत आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचावकार्यासाठी तातडीने पथके तयार करण्याची मागणी केली आहे. तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे.