google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

Republic day निमित्त croma कडून खरेदीवर विशेष सवलत

या प्रजासत्ताक दिनी, क्रोमामध्ये तुम्हाला मिळत आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीवर भरघोस बचत करण्याची संधी जी तुम्ही कधीही विसरु शकणार नाही. नवीन वर्ष सुरू होताच, ग्राहक क्रोमाच्या प्रजासत्ताक दिन विक्रीची आतुरतेने वाट पाहत असतात, हा सेल १६ जानेवारी ते २६ जानेवारी, २०२५ पर्यंत चालणार आहे, www.croma.com आणि Tata Neu वर इन-स्टोअर आणि ऑनलाइन दोन्ही ठिकाणी आकर्षक, अविश्वसनीय डील्स दिल्या जात आहेत.   

क्रोमाच्या प्रजासत्ताक दिन सेलमध्ये ग्राहकांना मिळत आहे, विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांवर आकर्षक सवलतींचा लाभ घेऊन स्वतःची जीवनशैली सुधारण्याची उत्तम संधी. २३ जानेवारीपासून, उष्म्यापासून स्वतःला वाचवा क्रोमा १.५ टन थ्री स्टार एसीसोबत, किमती ₹२५,६९०* पासून पुढे, क्रोमा ३०३ लिटर फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरसह तुमच्या स्वयंपाकघरात नवा तजेला आणा, किमती ₹२४,५९०* पासून पुढे. आता लॉन्ड्री करणे झाले अजूनच सोपे, कारण क्रोमा ८किलो टॉप लोड वॉशिंग मशिन ₹१४,३९०* पासून सुरू होणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे किंवा ₹ २१,६९०* पासून सुरू होणाऱ्या किमतीत क्रोमा ७किलो फ्रंट लोड वॉशिंग मशीन देखील तुम्ही निवडू शकता. घरामध्ये उत्तम मनोरंजनासाठी उत्साही लोकांसाठी, क्रोमा ऑफर करत आहे ₹३०,९९०* पासून सुरू होणाऱ्या किमतीत ५५-इंच युएचडी टीव्ही किंवा तुम्ही प्रीमियम ६५-इंचाचा UHD Google TV फक्त ₹४२,९९०* मध्ये खरेदी करू शकता. टेक-सॅव्ही  खरेदीदारांसाठी, इंटेल i3 लॅपटॉपसह ₹२६,५३०* पासून सुरू होणाऱ्या किमतीत सर्वोत्तम डील उपलब्ध आहेत. तुम्ही सर्वात नवीन गॅजेट्स शोधत असाल, तर सॅमसंग गॅलॅक्सी फोल्ड ५ ची किंमत फक्त ₹९८,९९०* रुपयांपासून पुढे आहे, तर ऍपल आयफोन १६ ची किंमत ₹३९,४९०* आहे.

तुम्हाला जास्तीत जास्त फायदेशीर खरेदीचा आनंद देण्यासाठी, निवडक बँक कार्डांवर ₹२६,००० पर्यंतचा झटपट कॅशबॅक ऑफर केला जात आहे. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अमेक्स, बॉब कार्ड्स, फेडरल बँक, कोटक महिंद्रा बँक, साऊथ इंडियन बँक आणि एचएसबीसीसह तुम्ही मिळवू शकता विशेष ऑफर. याव्यतिरिक्त, बजाज फिनसर्व्ह, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांसारख्या कन्ज्युमर फायनान्स प्रोव्हायडर्सकडून ₹२६,००० पर्यंतचा कॅशबॅक देखील मिळू शकतो.

क्रोमा – इन्फिनिटी रिटेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिबाशिष रॉय म्हणाले, “क्रोमाचा रिपब्लिक डे सेल हा आमच्या ग्राहकांप्रती आमची बांधिलकी अधोरेखित करण्याचा एक मार्ग आहे, आम्ही आमच्या ग्राहकांना बचत करण्याची अशी संधी देत आहोत जी ते कायम लक्षात ठेवतील. मोठमोठ्या बँका आणि कन्ज्युमर फायनान्स प्रोव्हायडर्सच्या विशेष ऑफर्स आणि सहयोगासह आम्ही सर्वांसाठी उच्च दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्सेसना सहज उपलब्ध करवून देऊ इच्छितो. तुम्ही स्टोरमध्ये येत आहात किंवा ऑनलाईन खरेदी करत आहात, आमच्याकडील विशाल रेंजमध्ये तुमच्या प्रत्येकासाठी काही ना काही नक्की आहे.” 

देशभरातील ५५० पेक्षा जास्त स्टोर्स आणि www.croma.com वर सर्वोत्तम ऑनलाईन शॉपिंग अनुभवासह क्रोमा हे सुनिश्चित करते की भारतभरातील ग्राहक या आकर्षक डील्सचा आनंद घेऊ शकतील आणि यंदाच्या रिपब्लिक डे सेलमध्ये सहभागी होऊन आपल्या जीवनशैलीमध्ये सुधारणा घडवून आणू शकतील.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!