अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘म्हणून’ मिळाले ​फिच वेदांताला रिसोर्सेसचे ‘बी+’ रेटिंग

वेदांता रिसोर्सेसची सुधारलेली तरळता, पुनर्वित्त जोखमीत लक्षणीय घट, कर्जात शिस्तबद्ध कपात आणि प्रमुख ऑपरेटिंग उपकंपन्यांकडून सातत्यपूर्ण रोख प्रवाह याचा हवाला देत फिच रेटिंग्जने कंपनीची दीर्घकालीन परकीय चलन जारीकर्ता डिफॉल्ट रेटिंग (IDR) ‘B+’ वर निश्चित केले आहे.

रेटिंग एजन्सीने VRL च्या असुरक्षित रेटिंग ‘B+’ ची पुष्टी केली आहे. VRL ने जारी केलेल्या जून 2028 मधील 300 दशलक्ष USD बॉन्ड्स आणि डिसेंबर 2031 च्या 500 दशलक्ष USD बाँड्सवर देखील एजन्सीने ‘B+’ रेटिंगची पुष्टी केली आहे.

गेल्या दोन वर्षांत VRL ची पुनर्वित्तकरण जोखीम लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे फिचने नमूद केले आहे. तर पुढील बाँड आणखी तीन वर्षांनी म्हणजेच जून 2028 मध्ये मॅच्युअर होणार आहे. अहवालानुसार, VRL चे कर्ज FYE25 पर्यंत सुमारे USD 5 अब्ज पर्यंत कमी झाले आहे जे FY22 मध्ये USD 9 अब्ज होते. FY27 पर्यंत त्यात आणखी USD 1 अब्ज कपात अपेक्षित आहे. कंपनीने FY26 मध्ये 10% पेक्षा कमी व्याजदराने कर्ज पुनर्वित्त करण्यासाठी सिंडिकेटेड कर्ज सुविधांद्वारे USD 1.1 अब्ज उभारले.

“VRL चा प्रमाणबद्ध एकत्रित EBITDA निव्वळ लीव्हरेज FY25 मध्ये 4.0x पेक्षा कमी झाल्याचा आमचा अंदाज आहे (FY24: 5.1x). पुढील दोन वर्षांत लीव्हरेज मोठ्या प्रमाणात स्थिर राहण्याची शक्यता असल्याचे फिचने त्यांच्या रेटिंगसंबंधीच्या अंदाजात म्हटले आहे.

व्हीआरएलच्या सुधारित आर्थिक शिस्त तसेच निधी उपलब्धतेचे फिचने नोंद घेतली आहे. खाण क्षेत्रातील या कंपनीने गेल्या दोन वर्षांत सक्रिय जबाबदारीचे व्यवस्थापकीय उपक्रम हाती घेतले आहेत. जे आर्थिक शिस्तीत सुधारणा दर्शवतातच पण विवेकपूर्ण आर्थिक व्यवस्थापनाचा हा दीर्घ रेकॉर्ड व्हीआरएलसाठी उच्च रेटिंग देऊ शकतो.

वेदांता ग्रुपच्या क्रेडिट प्रोफाइलबद्दल इतर प्रमुख जागतिक वित्तीय संस्थांनी यापूर्वीच सकारात्मक भूमिका मांडली आहे. त्यानंतर फिचचा व्हीआरएलसंबंधातील हा स्थिर दृष्टिकोन समोर आला आहे. बार्कलेजने गेल्या महिन्यात वेदांता रिसोर्सेस आणि त्याच्या समूह कंपन्यांनी जारी केलेल्या बाँड्सवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवले होते, ज्यामध्ये समूहाने डिलीव्हरेजिंग, कर्जाची किंमत कमी करणे आणि कर्जदारांना तसेच बाँडच्या किमतींना पाठिंबा देणाऱ्या कॉर्पोरेट ऍक्शन्सचा उल्लेख केला होता. अलीकडेच, बँक ऑफ अमेरिका (बोफा) ग्लोबल रिसर्चने वेदांता रिसोर्सेस लिमिटेड आणि त्याच्या उपकंपनीने जारी केलेल्या सिक्युरिटीजबाबत सकारात्मक मत दिले यात कंपनीच्या लिक्विडिटी जोखीममधील कपात, स्वस्त कर्ज आणि भविष्यात लाभांशावरील कमी अवलंबित्वाचा उल्लेख करण्यात आला होता. त्याचप्रमाणे, क्रिसिल आणि आयसीआरए सारख्या क्रेडिट रेटिंग एजन्सींनी देखील विविध सकारात्मक घटकांचा उल्लेख करत वेदांता लिमिटेडवरील त्यांच्या रेटिंगचा पुनरुच्चार केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!