केंद्रीय अर्थसंकल्पात विकसित भारताचे प्रतिबिंब: खंवटे
पर्यटन हे रोजगार आणि आर्थिक वाढीचे मुख्य चालक असल्याने भारत सरकारच्या पर्यटनाप्रतीच्या वचनबद्धतेची पुष्टी करणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६चे आपण स्वागत करतो. अर्थसंकल्पात कौशल्य विकास, होमस्टेसाठी मुद्रा कर्ज आणि महत्त्वाच्या स्थळांसाठी सुधारित पर्यटन पायाभूत सुविधांवर भर दिल्याने, गोव्याला याचा मोठा फायदा होणार आहे.
अध्यात्मिक आणि वेलनेस पर्यटनावर अर्थसंकल्पाचा भर, हा गोव्याच्या सामर्थ्याशी सुसंगत आहे. तसेच वर्धित कनेक्टिव्हिटी आणि सुव्यवस्थित ई-व्हिसा सुविधा यामुळे आंतरराष्ट्रीय आगमन आणखी वाढणार आहे. गोव्याला जागतिक पर्यटनात अग्रेसर बनवण्यासाठी आम्ही सर्व भागधारकांसोबत काम करण्यास कटिबद्ध आहोत.
याव्यतिरिक्त, अर्थसंकल्पात आयटी क्षेत्राशी संबंधित केलेल्या घोषणा आशादायी आहेत. डिजिटल पायाभूत सुविधांवर भर, उदयोन्मुख तंत्रज्ञानातील कौशल्य प्रशिक्षण आणि स्टार्टअपसाठी प्रोत्साहन, यामुळे भारत आणि गोव्यातील तरुण तसेच उद्योजकांसाठी नवीन संधी निर्माण होतील. डिजिटल जोडणी बळकट झाल्याने दूरस्थ आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी केंद्र म्हणून भारताचे आकर्षण आणखी वाढेल, ज्याचा गोव्यालाही मोठा फायदा होईल.
आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे, त्यांचा दूरदर्शी दृष्टीकोन आणि भारताच्या पर्यटन व तंत्रज्ञान क्षेत्रांना बळकट करण्यासाठी दिलेल्या अतुलनीय पाठिंब्यासाठी आभार मानतो.