लेख

दुधगाव ते बॉलिवूड; ‘अशी’ साकारली शामरावांची ‘मयसभा’

  • अनिल बनसोडे

सातारा जिल्हातील महाबळेश्वर प्रतापगड आणि मकरंदगडाच्या पायथ्याशी अतिशय दुर्गम भागात एक असे छोटेसे खेडेगाव ज्याचे दुधगाव असे नाव आहे. हे गाव एवढे अडगळीत आहे की जेथे जाण्यासाठी नीटसा रस्ता नाही, त्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क नाही ज्या गावामध्ये जेमतेम 40 ते 50 घर आहेत. परंतु आजुबाजूला असलेला निसर्ग, डोंगरदऱ्या, सर्वत्र असणारी हिरवळ ही मात्र ह्या गावास लाभलेली निसर्गाची जणू देणच म्हणावी लागेल.

अशा निसर्गाच्या कुशीत वसलेल्या दुधगावतून घरची परिस्तिथी अतिशय जेमतेम असल्यामुळे 1999 ला बारावी नंतर फणस विकण्याच्या बहाण्याने एक मुलगा मुंबईला येतो. आणि इथेच मिळेल ते काम करून आपली उपजीविका भागवत गावाला आई ,वडील, भाऊ यांना मदत करतो. तो मुलगा म्हणजेच शाम भगवान यादव.

मुंबईमध्ये मिळेल ते काम करून आपले पाय मजबूत करत असताना तीन चार वर्ष लोटले होते. परंतु त्याच्या मनामध्ये शिक्षणाची इच्छा मात्र कायम जिवंत होती. त्यामुळे पुढे त्यांनी काम करून BA पूर्ण केले. पुढे सन 2013 -2014 मध्ये MBA(फायनान्स) पूर्ण केले. आणि एका दवाखान्यामध्ये नोकरीसाठी स्थिरावला. नोकरी करत असताना लग्न होते कौटुंबिक जबाबदारी पेलवत आपली नोकरी व कुटुंब सावरतो.

rahi-anil-barve-mayasabha-movie-producer-article

परंतु माणूस हा कितीही साधा व सरळमार्गी असला तरी त्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक ताण येत असतो.अशा अवस्थेत हा माणूस कधी व्यसनाच्या आहारी न जाता भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहे आंबेडकर यांच्या विचाराणे प्रेरित होतो.
अशा तनावी मानसिकतेत मग हा तरुण मनोरंजनासाठी कधी कधी एकटाच चित्रपट बघत बसतो व आपला मानसिक ताण कमी करतो. असे अनेकदा घडत गेले. आणि त्यामुळे त्याला आपणही अशा चित्रपट किंवा नाट्यक्षेत्रात काम केले पाहिजे असे वाटू लागले. म्हणून 2017 साली स्वतः निर्मित एक मराठी नाटक काढले. परंतु तो नाट्यक्षेत्रातला पहिलाच प्रयोग असल्याकारणाने व अनुभव नसल्यामुळे ते नाटक चालू शकले नाही.

पुढे असेच चित्रपटाचे वेड लागल्याने त्याने स्वतः ​ अस्तोनिया नावाने प्रोडक्शन कंपनी स्थापन केली आणि निर्माता बनला. 2017-18 मध्ये पर्यावरणावर दोन शॉर्ट फिल्म बनवल्या त्यास बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला, काही पारितोषिकही मिळाली. अशाच त्यांचे समाजसेवी वृत्ती असलेले वडील दिवंगत झाले व डोक्यावरचे छत्र हरवून गेले. तसा त्यांना जीवनातला खूप मोठा मानसिक धक्का बसला. अशा परिस्थितीत मग डोक्याचा त्रास कमी होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी मग आपले मन चित्रपट निर्मितीकडे वळवले त्यानंतर या ध्येयवेड्याने इकडून तिकडून उधार पैसे घेऊन 2020-22 मध्ये बडे अब्बू (कोंकणी फिल्म ), स्टेअरिंग (हिंदी फिल्म ) स्वतः निर्मित बनवली आणि अस्मानी संकटात अडकून कोरोना परिस्थितीमुळे रिलीज झाली नाही.

परंतु त्याच काळात झिरकॉन आणि थर्ड आय प्रॉडकक्शन बरोबर ‘मयसभा’ नावाची हिंदी फिल्म बनवली ज्याचा डायरेक्टर (तुंबाड  चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे आहे ) त्यात वीणा जामकर, जावेद जाफरी, दिपक दामले, समद असे असे प्रभावी कलाकार आहेत.
अशा या ध्येयवेड्या तरुणाच्या प्रयत्नातील हा सिनेमा आता 16 नोव्हेंबर रोजी जागरण फिल्म फेस्टिव्हल मध्ये प्रीमियर झाला. जो सर्वांना खूप आवडला. त्याची प्रशंसा सर्वांनी केली. असा हा सस्पेन्स थ्रिलर असणारा ‘मयसभा’ चित्रपट जानेवारी 2026 ला संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे.

rahi-anil-barve-mayasabha-movie-producer-article

चित्रपट व नाटक या ध्येयाने प्रेरित झालेल्या ह्या ध्येयवेड्या शामराव भगवान यादव या तरुणाने चित्रपट निर्मितीसाठी आपले सर्व कमावलेले जमापुंजी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पणाला लावले आहे. खूप त्रास सहन करून लोकांचे बोलणे, टोमणे ऐकून, परिवारासह स्वतः मानसिक त्रास सहन करून शामराव भगवान यादव यांनी दोन निर्मात्यांना सोबत घेऊन खूप मोठी रिस्क उचलली आणि ‘मयसभा’ ह्या चित्रपटाच्या निर्मात्यांची (film producer)भूमिका बजावली आहे.

कोरोनामुळे अडचणीत आलेल्या परिस्थितीमुळे सहकारी सर्वांनीच अशा सोडून दिल्या होत्या पण शामराव या निर्मात्याने हार मानली नाही. तेव्हा अशा जिगरबाज व ध्येयवेड्या निर्मात्याच्या धाडसास शाबासकी म्हणून हा सिनेमा प्रदर्शित होताच सर्वांनी चित्रपट गृहात जाऊन नक्कीच बघावा व अशा मराठमोळ्या चित्रपट निर्मात्यास प्रेरणा द्यावी.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!