‘अजिंक्यताऱ्या’वर ‘सातारा स्वाभिमान दिन’ साजरा…
सातारा (महेश पवार) :
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांनी साताऱ्याची स्थापना केली..1708 साली छत्रपती शाहू महाराजांचा किल्ले अजिंक्यताऱ्यावर राज्याभिषेक करण्यात आला..गेल्या 12 वर्षांपासून राजधानी सातारा शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने किल्ले अजिंक्यताऱ्यावर 12 जानेवारीला ‘सातारा स्वाभिमान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो..यंदाचे हे 13 वे वर्ष आहे… अजिंक्यतारा किल्ल्याची फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आलीये..थोरले शाहू महाराजांची मूर्ती पालखीमध्ये ठेवण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पालखीला खांदा देत पालखी किल्ल्यावर नेली.. पारंपरिक वाद्य वाजवत पालखी किल्ल्यावर उत्साहाच्या वातावरणात नेण्यात आली.. शिवप्रेमींमधून चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.. मान्यवरांकडून आणि शिवभक्तांकडून छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.