google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

वाईच्या ‘या’ पठ्याने चक्क पॅराग्लाइडिंग करत गाठले कॉलेज…

सातारा (महेश पवार) :
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी त्याच्या कॉलेजच्या बॅग सकट पॅराग्लाइडिंग करताना दिसत आहे.सोशल मीडियावर या व्हिडिओला लाखो मध्ये व्ह्यूज आणि लाईक्स मिळालेले आहेत.सातारा जिल्ह्यातील पसरणी गावातील ही घटना आहे.

या गावातील समर्थ महांगडे हा विद्यार्थी परीक्षेच्या दिवशी चक्क पॅराग्लायडिंग करून पेपरला पोहोचला.काही घरगुती कामानिमित्त समर्थ पाचगणी ला गेला होता.परंतु तिथे गेल्यावर त्याला समजलं की आज आपला कॉलेजमध्ये पेपर आहे.आणि आता केवळ पंधरा ते वीस मिनिटात बाकी आहेत. नेमके त्यादिवशी वाई-पाचगणी  रोड वरील पसरणी या घाटात वाहतुकीची कोंडी झाली होती आणि त्यामुळे परीक्षेच्या वेळेत घाट मार्गाने जाऊन पोहोचणे अशक्य झाले होते. आता आपली परीक्षा बुडणार या टेन्शनमध्ये हा विद्यार्थी असतानाच.पाचगणी मध्ये पाराग्लाइडिंग करणारे जीपी एडवेंचर्स या ग्रुपचे गोविंद येवले यांनी या विद्यार्थ्यांची मदत करण्याचे ठरवले. त्यांनी चक्क पॅराग्लायडिंग करत या विद्यार्थ्याला पसरणीचा घाट पार करून गावामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी घेतली.दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे समर्थने सुद्धा भीतभीतच पॅराग्लायडिंग करत खाली जाण्याचा निर्णय घेतला.आणि अखेर हा पठ्ठ्या पॅराग्लाइडिंग करत परीक्षा देण्यासाठी कॉलेजला गेला.
या प्रसंगात पॅराग्लायडिंग संस्थेच्या संस्थापकांनीही त्याला मदत केली. त्यांनी त्याला पॅराग्लायडिंग करून सोडण्याचे ठरवले आणि त्याला सुरक्षितपणे परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवले.



“माझा पेपर सुरू होण्यापूर्वी फक्त २० मिनिटे शिल्लक होती आणि मला वाटले की मी वेळेवर पोहोचणार नाही. गोविंद येवले सर यांनी पॅराग्लायडिंग चा सल्ला दिला आणि मी तो धाडसाने पत्करला. हा एक अनोखा अनुभव होता.”जीपी एडवेंचर्स चे गोविंद येवले सर यांच्यामुळे मी पेपरला पोहोचू शकलो नाही तर घाटातील वाहतूक कोंडीमुळे माझा पेपर नक्कीच बुडाला असता त्यामुळे मी त्यांचा कायम आभारी आहे.

वाई पाचगणी रोडवर असणाऱ्या पसरणी घाटामध्ये बऱ्याच वेळा वाहतूक कोंडीचा सामना हा पर्यटकांना करावा लागतो. परंतु या वाहतूक कोंडीवर मात करत समर्थ महांगडे या विद्यार्थ्याने थेट आकाशातून पॅराग्लायडिंग करतच कॉलेजमध्ये एन्ट्री मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.

पाचगणी मधील हॅरीसन फॉलि पॉईंटवर आम्ही या पॅराग्लाइडिंगच्या जॉयराइड् लोकांना देत असतो. त्यादिवशी तिथं लोकांमध्ये चर्चा होती की या विद्यार्थ्यांचा पेपर काही वेळात सुरू होणार आहे.आणि आता घाटामध्ये ट्रॅफिक जाम असल्यामुळे हा विद्यार्थी पेपरला पोहोचू शकणार नाही.त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला कारण त्याची परिस्थिती खरोखरच गंभीर होती. तो घाबरला होता. पण आम्ही त्याला पेपर सुरू होण्याच्या आधी वेळेत पोहोचू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. 

  • समर्थ महांगडे, विद्यार्थी.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!