हेळगावात क्रीडा सुविधेसाठी मंजूर झाले ‘इतके’ कोटी…
कराड (अभयकुमार देशमुख) :
राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने हेळगाव ता.कराड येथे पायाभूत सुविधा पुरविणेसाठी, क्रीडा सुविधा निर्मिती आर्थिक सहयय २०२१-२२ या योजने अंतर्गत बंदिस्त प्रेक्षागृह बांधणे या कामासाठी १ कोटी ५५ लाख रुपये मंजूर झाले.
त्याचे भूमिपूजन आज आमदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सदर इमारत ३५ मीटर बाय २० मीटरची असून यामध्ये ४ बॅडमिंटन कोर्ट व ४ टेबल टेनिस कोर्ट ची सुविधा करण्यात येणार असून या प्रेक्षागृहामध्ये सुमारे ५०० प्रेक्षक बसण्याची सोय होणार आहे.
याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, मानसिंगराव जगदाळे व इतर मान्यवर उपस्थित होते.