google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

Nana Patekar : ‘मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार’

Nana Patekar : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) सध्या त्यांच्या ‘ओले आले’ (Ole Aale) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. येत्या 5 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. नाना सध्या या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहेत. दरम्यान झी या हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना नानांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नरेंद्र मोदी (Naredra Modi) देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार : Nana Patekar

‘झी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते नाना पाटेकर म्हणाले,”आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला साडे तीनशे ते पावणे चारशे जागा मिळतील. तसेच भाजपाला पर्याय नाही. नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा प्रंतप्रधान होणार”. नाना पाटेकरांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नाना पाटेकरांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला साडे तीनशे ते पावणे चारशे जागा मिळतील असं भाकित त्यांनी केलं आहे. देशभरात मोदी सरकार शानदार काम करत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच त्यांना यश नक्कीच मिळेल. भाजपला बहुमत मिळणार आणि नरेंद्र मोजी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार”.

एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणूक होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सगळे राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकीत भाजपाला यश मिळालं आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. अशातच आता लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळणार, असं भाकित नाना पाटेकरांनी केलं आहे. नानांचं भाकित आता खरं ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!