
लिस्बन, पोर्तुगाल:
गोवा राज्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी पोर्तुगालमधील प्रसिद्ध बेन्फिका फुटबॉल क्लबला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रेमेंद्र शेट (मये), आमदार अँटोन वाझ (कुर्टालिम) आणि गोवा सरकारचे क्रीडा सचिव सुनील अंचीपाका (IAS) उपस्थित होते.
या दौऱ्यात बेन्फिका इंटरनॅशनल ग्लोबल एक्सपान्शन कोऑर्डिनेटर मिगेल रीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि क्लबच्या संपूर्ण कॅम्पसला भेट दिली.
या भेटीदरम्यान गोवा राज्य क्रीडा विभाग आणि बेन्फिका फुटबॉल क्लब यांच्यात जागतिक दर्जाच्या सहकार्याच्या संधी शोधल्या गेल्या. क्रीडा मंत्री गावडे यांनी बेन्फिका क्लबच्या अधिकाऱ्यांना गोवा भेटीचे निमंत्रण दिले, जेणेकरून पुढील गोमंतकीय विद्यार्थी/खेळाडूंची निवड, क्रीडा कौशल्याचा विकास, विशेष प्रशिक्षकांची नेमणूक तसेच आवश्यक क्रीडा पायाभूत सुविधांची तपासणी यासाठी एक सकारात्मक भागीदारी प्रस्थापित करता येईल.
ही भेट गोव्यातील क्रीडा क्षेत्राला नवीन दिशा देणारी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.