
महाराष्ट्र
अहिराणी भाषेचे अभ्यासक डॉ. सुधीर देवरे यांना जीवन गौरव पुरस्कार
नाशिक:
भाषातज्ज्ञ, अहिराणी भाषेचे गाढे संशोधक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांना ‘खानदेश विकास मंडळ व जागतिक अहिराणी संवर्धन परिषद’ यांच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रविवार, २७ जुलै २०२५ रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते डॉ. सुधीर देवरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
‘अहिराणी लोकपरंपरा’, ‘अहिराणी गोत’, ‘अहिराणी वट्टा’, अहिराणी लोकसंस्कृती’, ‘अहिराणीच्या निमित्ताने: भाषा’, ‘सोन्यानी शाळा’, ‘सायकोना तिढा’, ‘भाषा : व्याप्ती आणि गंड’, ‘अहिराणी : भाषा, परंपरा आणि लोकसंस्कृती’, ‘गावदवंडी’, ‘डोंगरदेव’, आदी अहिराणी भाषा, भाषा व लोकसंस्कृती विषयक डॉ. देवरे यांची ग्रंथसंपदा प्रकाशित आहे.