‘प्रेक्षकांशी जोडली जाईल अशी कथा निर्माण करणे हा आमचा उद्देश होता’
विश्वासघात, सूड आणि अंधुक वास्तव यांची मनावर घट्ट पकड घेणारा ‘साली मोहोब्बत’ हा चित्रपट भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यातील संबंधांचे पिळदार जाळे विणून, एक असा थरारकपट समोर आणतो ज्यात कथेतील वळणे सच्च्या भावना आणि समृद्ध पात्रांनी संचालित नाट्य दर्शवितो.
गोव्याच्या चैतन्याने रसरसलेल्या परिसरात आयोजित 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पत्रकार परिषदेत आज ‘साली मोहोब्बत’ याचित्रपटातील कलाकार आणि निर्मितीशी संबंधित पथकाने प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत चित्रपट निर्मितीचा अनुभव आणि आकांक्षा सामायिक केल्या.
सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचा हा चित्रपट निर्मितीचा पहिलाच प्रयत्न. फॅशन उद्योगाच्या पार्श्वभूमीने त्यांच्या चित्रपट निर्मिती शैलीला विशेषतः दृग्गोचर कथाकथन तसेच तपशीलाकडे विशेष लक्ष देण्यासंदर्भात कशा प्रकारे प्रभावित केले याबद्दल मल्होत्रा यांनी चर्चा केली. दिखाव्यापेक्षा पात्रांच्या गहनतेवर लक्ष एकाग्र करणारी आणि जमिनीवर पाय घट्ट रोवून असलेली अस्सल कथा किती महत्त्वाची असते हे सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिला. ‘हूडनइट’ शैलीचा शोध घेण्याच्या उत्सुकता व्यक्त करत मनीष मल्होत्रा म्हणाले की पारंपरिक वळणाने जाणाऱ्या कथेऐवजी प्रेक्षकांशी जोडली जाऊन त्यांच्यासह भावनिक दृष्ट्या प्रतिध्वनित होणारी कथा निर्माण करणे हा आमचा उद्देश होता.
सह-निर्मात्या ज्योती देशपांडे यांनी अलिकडच्या वर्षांत आपण मोठे यशस्वी चित्रपट पाहिलेले नाहीत, असे सांगून सूक्ष्म कथाकथनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी चित्रपटाचा भारतात प्रीमियर केल्याचा अभिमान वाटत असल्याचे मनोगत व्यक्त केले. चित्रपटाच्या मूळ देशात जागतिक प्रीमियर होणे तशी दुर्मिळ गोष्ट असते, असेही त्या म्हणाल्या. पटकथेत एकदम धक्कादायक काही घडतंय, यावर विसंबून न राहता त्या कथानकातील भावनिक व्यस्ततेमुळे तो कसा वेगळा ठरू शकतो, हे लक्षात घेऊन, चित्रपटाच्या पात्राभिमुख दृष्टिकोनाबद्दल मी विशेषत्वाने उत्साहित होते, असे ज्योती देशपांडे यांनी सांगितले.
चित्रपटाच्या दिग्दर्शिका टिस्का चोप्रा यांनी पारंपारिक शैलीऐवजी सूक्ष्मता आणि भावनिक अनुनाद यावर लक्ष केंद्रित करून चित्रपटाविषयीचा आपला दृष्टिकोण सांगितला. सिनेमा करताना टीममधील सहकार्यावर टिस्का यांनी भर दिला्. प्रत्येक तपशील-स्क्रिप्टपासून परफॉर्मन्सपर्यंत-चित्रपट एकूण प्रभावशाली ठरण्यासाठी सर्व टीमने मिळून योगदान दिले, असे त्या म्हणाल्या.
अभिनेता दिब्येंदू याने बाह्य रहस्याऐवजी पात्रांच्या जटिलतेवर लक्ष केंद्रित करून ठराविक वेग कायम ठेवून होणाऱ्या चित्रपटाच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले केले की, टीमने पात्रांच्या नातेसंबंधातून आणि प्रेरणांद्वारे मानसिक तणाव कसा निर्माण होत आहे, याची खात्री करून प्रेक्षकही त्यामध्ये गुंतून राहतील, याकडे लक्ष दिले्. हे करताना कथेचचा खोलवर होणारा परिणाम आणि पात्रांची भावनिक गुंतवणूक हा या सिनेमाचा गाभा ठरला, असेही दिब्येंदू म्हणाले.
भावनिकदृष्ट्या आकर्षक आणि विचार करायला लावणारा चित्रपट तयार करण्याचे आमचे उद्दिष्टे होते, त्यावर भर दिल्यामुळे प्रेक्षकांना पात्र आणि त्यांच्या प्रेरणांबद्दल सखोल समजून घेता येईल, अशी खात्री करून टीमने निष्कर्ष काढला,असे ते म्हणाले.