
पणजी :
भारताच्या मनोरंजन आणि डिजिटल इनोव्हेशन लँडस्केपमधील एक प्रमुख नाव असलेले मनीष कुमार, हे गोव्यात प्रथमच एआयच्या माध्यमातून सिनेमा कसा ‘सांगायचा’ याची विशेष कार्यशाळा घेणार आहेत. “स्मार्ट स्टोरीज: युजिंग एआय टू एन्हान्स क्रिएटिव्हिटी” या शीर्षकाची हि कार्यशाळा १४ व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा भाग म्हणून, ८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता, प्रेस रूम, ओल्ड जीएमसी कॉम्प्लेक्स, आयनॉक्स, पणजी येथे होणार आहे.
डिजी ऑस्मोसिसचे संस्थापक आणि सीईओ, मनीष कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीत डिजिटल मार्केटिंगचे अग्रणी म्हणून ओळखले जाते. त्यांनी अमेझॉन प्राइम व्हिडिओ, झी५, वॉर्नर ब्रदर्स आणि टी-सीरीज सारख्या प्रमुख प्लॅटफॉर्मसाठी काम केले आहे. १७ वर्षांहून अधिक अनुभवासह, त्यांनी कथाकथनाशी तंत्रज्ञानाचे संयोजन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, विशेषतः रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सोबत काम करताना त्यांनी ५० हून अधिक फीचर फिल्म्ससाठी डिजिटल स्ट्रॅटेजीजचे व्यवस्थापन केले आहे.
सध्या ते V4B.AI, या उप्रकमावर काम करत असून, यामाध्यमातून सिनेनिर्माते आणि सिनेमा व्यवसायांला एआय-संचालित साधनांनी सुसज्ज करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यामुळे सिनेमाचा उत्पादन खर्च आणि टर्नअराउंड वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.
सिनेमा आणि तंत्रज्ञानातील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे मनीष कुमार यांना ‘कान्स लायन्स २०२५’ आणि ‘लंडन टेक वीक’मध्ये विशेष निमंत्रित होते. त्यांना ३० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. गोव्यात होणाऱ्या त्यांच्या या आगामी कार्यशाळेत ते कृत्रिम बुद्धिमत्ता कथाकथन प्रक्रियेला कसे आकार देत आहे आणि कंटेंट निर्मितीच्या भविष्यासाठी त्याचे परिणाम कसे आहेत यावर विशेष भर देण्यात येणार आहे. सदर कार्यशाळा प्रथम प्रवेश प्रथम प्राधान्य तत्वावर सर्वांसाठी खुली असल्याचे आयोजकांच्यावतीने कळवण्यात आले आहे. १४ वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव ९ आणि १० ऑगष्ट रोजी होणार असून त्यात वीसपेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. त्यातील आठ चित्रपट एकदम नवीन असून अजून कुठेहि प्रदर्शित झाले नाहित.