लेख

जिंकलेल्या बक्षीस किंवा भेटवस्तूसाठी कर का भरावा?

  • राजेश बाणावलीकर

बक्षीस म्हणजे स्पर्धेत किंवा स्पर्धेत जिंकलेली गोष्ट, तर भेट म्हणजे परतफेडीची अपेक्षा न करता स्वेच्छेने दिलेली गोष्ट. महत्त्वाचा फरक असा आहे की बक्षीस स्पर्धेद्वारे मिळवले जाते, तर भेटवस्तू ही सद्भावना, कौतुक किंवा प्रेमाचे प्रतीक म्हणून दिली जाते. माझ्या एका मित्राने वॉशिंग मशीन खरेदी केल्यावर स्क्रॅच गिफ्ट कूपनवर लॉयड एसि जिंकला. पण कंपनी डिलिव्हरीपूर्वी ₹९०००/ टी डी एस. मागत आहे. ही भेट आहे का? भेटवस्तूची परंपरा लुटमारीच्या व्यवसायात रूपांतरित होत आहे. हे थांबवायला हवे. कारण फॅसिनो दुचाकी विजेत्याला गणेश मंडळाने ₹२५०००/ कर भरण्यास भाग पाडले  होते.

भारतात बक्षिसाच्या रकमेवर आणि भेटवस्तूंवर कर वजावट (TDS) लागू केली जाते कारण अशा जिंकलेल्या वस्तू आयकर कायद्यांतर्गत उत्पन्न मानल्या जातात. सरकार या “अनपेक्षित नफ्यावर” आगाऊ कर वसूल करण्यासाठी स्त्रोतावर वजावट अनिवार्य करते, जे सामान्यतः अनियमित असतात आणि एखाद्या व्यक्तीच्या नियमित कमाईचा भाग नसतात.  पण हा कर किंवा काहीही, आयोजकांनी किंवा प्रायोजकांनी भरावा. लाभार्थी का? कर भरताना भेटवस्तू किंवा बक्षीस याचा अर्थ रद्द होतो.

कर चुकवेगिरी रोखण्यासाठी आणि उत्पन्न निर्माण होते तेव्हा सरकार कर वसूल करते याची खात्री करण्यासाठी बक्षिसे आणि भेटवस्तूंवर स्रोतावर कर वजावट (टीडीएस) आवश्यक आहे. या जिंकलेल्या वस्तू आयकर कायदा, १९६१ अंतर्गत उत्पन्न मानल्या जातात आणि कराच्या विशिष्ट तरतुदींच्या अधीन आहेत. परंतु भेटवस्तू आणि बक्षिसे करमुक्त असणे आवश्यक आहे.

टीडीएस यंत्रणेचा प्राथमिक उद्देश आर्थिक वर्षाच्या शेवटी प्राप्तकर्त्यावर अवलंबून राहून हे अनियमित, “अनपेक्षित” उत्पन्न घोषित करणे आहे. ही गणना मध्यमवर्गीय आणि सामान्य माणसासाठी नाही तर श्रीमंत लोकांसाठी आहे. आपण असे गृहीत धरतो की भेटवस्तू किंवा बक्षीस मानवी जीवनात चांगले ” नशीब “आहे. म्हणून भेटवस्तू करपात्र नसावी. जर ती अनिवार्य असेल तर कायद्यात सुधारणा करा. म्हणे बक्षीसाला कर ! का? बक्षीस केवळ बक्षीस असावे…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!