“महाराज, आता तिकीट द्या, नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या”
साताऱ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये प्रत्येक इच्छुक उमेदवार पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर हे मसूर जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहेत.
https://youtube.com/shorts/CHCbPxwYpSA?si=QZ9qGc4FsxwP_ahx
याआधी झालेल्या निवडणुकांमध्ये कुलदीप क्षीरसागर यांनी उदयनराजे यांच्या निवडणुकीची धुरा समर्थपणे सांभाळली होती. तसेच मागील विधानसभेच्या निवडणुकीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, उदयनराजे यांच्या शब्दाला मान देत त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती.
या पार्श्वभूमीवर कुलदीप क्षीरसागर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपल्या उमेदवारीची मागणी उदयनराजे यांच्याकडे केली. यावेळी उदयनराजे यांच्याशी बोलताना त्यांनी, “आता उमेदवारी द्या, नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या”
अशी अजब टिप्पणी केली. ही टिप्पणी ऐकून उदयनराजे यांनाही हसू आवरता आले नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.






