अर्थमत/ टेक्नॉलॉजी

इंडसइंड जनरल इन्शुरन्सच्या एमडी आणि सीईओपदी शरद माथूर

मुंबई : इंडसइंड जनरल इन्शुरन्सच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (एमडी आणि सीईओ) शरद माथूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यक वैधानिक मंजुरी मिळाल्यानंतर कंपनीने ही घोषणा केली. इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड (IIHL) समूहाचा भाग असलेल्या या कंपनीचे पूर्वीचे नाव रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड असे होते.


माथूर यांना विमा आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील तीन दशकांचा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी युनिव्हर्सल सोमपो जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ म्हणून सहा वर्षांहून अधिक काळ काम केले. तसेच एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि आयसीआयसीआय लोम्बार्डमध्येही त्यांनी नेतृत्वाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.


इंडसइंड जनरल इन्शुरन्समध्ये ते कंपनीच्या विकास आणि परिवर्तन प्रक्रियेचे नेतृत्व करणार आहेत. ग्राहकसेवा सुधारणे, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, वितरण भागीदारांशी सहकार्य मजबूत करणे आणि शाश्वत व्यवसायवृद्धी साधणे यांवर त्यांचा भर असेल.


कंपनी मोटार, आरोग्य, प्रवास आणि गृहविमा सेवा पुरवते. देशभरात कंपनीचे १२८ कार्यालये असून, एक लाख २० हजारांहून अधिक मध्यस्थांचे वितरण जाळे आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!