‘का’ झाली प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा यांना शिक्षा?
चेन्नई न्यायलयाने प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना ६ महीने तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. चेन्नईच्या रायपेटा विभागातील जया प्रदा यांच्या मालिकेच्या चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. याबरोबरच त्यांना ५००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
या चित्रपटगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इएसआयचे पैसे दिले नसल्याने त्यांनी चित्रपटगृहाच्या मॅनेजमेंटविरोधात न्यायलयात धाव घेतली आहे. कोर्टात प्रकरण गेल्यावर थकलेली रक्कम परत देण्याचे आश्वासनही अभिनेत्री जया प्रदा यांनी दिले. इतकंच नव्हे तर हा खटला रद्द करण्याची विनंतीसुद्धा जया प्रदा यांनी केली.