बुडालेल्या द्वारकेची भेट घेतल्यानंतर ‘काय’ म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोल समुद्रात पाण्याखाली जाऊन द्वारका नगरी जिथे पाण्याखाली गेली होती त्या ठिकाणी प्रार्थना केली. या अनुभवाने भारताच्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक मुळांशी दुर्मिळ आणि सखोल तादात्म्य दिले आहे.
समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा असलेल्या द्वारका शहराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. पाण्याखाली असलेल्या या ठिकाणी त्यांनी मोरपिसे देखील अर्पण केली.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले :
“जलसमाधी मिळालेल्या द्वारका नगरीच्या ठिकाणी प्रार्थना करणे हा एक दिव्य अनुभव होता. अध्यात्मिक उन्नती आणि कालातीत भक्तीच्या प्राचीन काळाशी जोडले गेल्याची अनुभूती मला आली. भगवान श्रीकृष्णांचा आपणा सर्वांवर आशीर्वाद राहो”.