गोव्यात काही दिवसांपासून मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाले आहे. विमानतळावरून उड्डाणे देखील सुरू झाली आहेत. मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर दाबोळी विमानतळाचे काय होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र गोव्यात नवीन विमानतळ होण्याने दाबोळीच्या उड्डाणांवर कोणताही परिणाम झाला नाहीये.
याबाबत एक नवीन माहिती अशी की, दाबोळी विमानतळावरुन एअर इंडियाने नव्या उड्डाणाची माहिती दिली आहे. गोव्यातून दुबईला जाणारी गोवा-दुबई (GOI-DXB) ही फ्लाईट येत्या 26 मार्चपासून सुरू होणार आहे.
माहितीनुसार, ही फ्लाईट सोमवार, मंगळवार, शनिवार आणि रविवारी असणार आहे. इंधनाचे दर कमी झाल्यामुळे विमान कंपन्यांची गोव्याकडे पसंती वाढली आहे.