गोव्यातील कॉंग्रेस नेते तथा युवक कॉंग्रेसचे प्रभारी जनार्दन भांडारी यांनी आज नवी दिल्लीत अखिल भारतीय कॉंग्रेसचे सचिव तथा युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अलावरु यांची भेट घेवुन गोव्यातील राजकीय परिस्थिती व पक्ष बांधणीवर चर्चा केली.गोव्यातील विद्यमान राजकीय परिस्थिती तसेच कॉंग्रेसच्या सच्चा व निश्ठावान कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी पक्षाने हाती घ्यावयाच्या कृती आराखड्याबद्दल मी सखोल चर्चा केली. गोव्यात युवक कॉंग्रेसकडुन हाती घेण्यात येणाऱ्या विवीध उपक्रमांची माहितीसुदधा कृष्णा अलावरु यांना दिल्याचे जनार्दन भांडारी यांनी सांगितले.
गोव्यात कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आपला संपुर्ण पाठिंबा व सहकार्य देण्याचे आश्वासन मला कृष्णा अलावरु यांनी दिले असुन, आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करुन ते पुढील दिशादर्शक धोरणे आम्हाला कळवितील. गोव्यातील ज्येष्ठ नेत्यांचा आशिर्वाद व पाठिंबा घेवुनच आम्ही कॉंग्रेस पक्ष बळकट करणार आहोत असे जना भांडारी यांनी सांगितले.
युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अलावरु यांनी गेल्या वर्षी अनेकदा गोव्याला भेट दिली होती. गोव्यातील कार्यकर्त्यांबद्दल त्यांना प्रेम असुन, कोविडच्या संकटात आमच्या युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या ऑक्सिजन सिलींडर पुरवठ्याबद्दल त्यांनी आमचे अभिनंदन केले होते याची आठवण जनार्दन भांडारी यांनी करुन दिली.
गोव्यातील नवीन कॉंग्रेस नेतृत्वाबद्दल आम्ही चर्चा केली. मी माझे प्रामाणीक मत त्यांच्या समोर ठेवले असुन, माझ्या भावनांची दखल केंद्रिय नेतृत्व नक्कीच घेणार असल्याचा विश्वास जनार्दन भांडारी यांनी व्यक्त केला.