देश/जग

जपानच्या माजी पंतप्रधानांवर गोळीबार

टोकियो:

माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना नारा शहरात गोळ्या घालण्यात आल्याचे वृत्त जपानच्या NHK ने दिले आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर एका भाषणादरम्यान पश्चिम जपानमधल्या नारा शहरामध्ये गोळीबार करण्यात आला आहे.

या गोळीबारात ते जखमी झाल्याची शक्यता आहे. NHKया जपानी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या पत्रकाराने या ठिकाणी गोळी झाडल्यासारखा आवाज ऐकला आणि शिंजो आबे जखमी झाल्याचंही पाहिलं.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे शुक्रवारी नारा येथील रस्त्यावर भाषण करत असताना मागून एका व्यक्तीने हल्ला केला. पोलिसांनी या हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!
%d bloggers like this: