आज होणार नॉलेज टर्मिनस 0.5 चे उद्घाटन
फोंडा (प्रतिनिधी) :
गोव्याचा ज्ञान महोत्सव असलेल्या नॉलेज टर्मिनसच्या पाचव्या आवृत्तीचे म्हणणेच परिक्रमा नॉलेज टर्मिनस झिरो पॉईंट फाईव्हचे उद्घाटन शनिवार 28 जानेवारी रोजी समाज कल्याण मंत्री सुभाष फळ देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला अर्जुन पुरस्कार विजेत्या भक्ती कुलकर्णी, कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे, परिक्रमा नॉलेज टर्मिनसचे अध्यक्ष युगांक नायक, केरी गावच्या सरपंच यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
उद्घाटन समारंभामध्ये संस्थेच्या वतीने प्रा. प्रकाश वजरीकर आणि सुभाष जाण यांना परिक्रमा फेलोशिप तर रमा मुरकुंडे यांना डॉ. माधवी सरदेसाई युवा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
28 आणि 29 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या नॉलेज टर्मिनसमध्ये राज्यभरातील सुमारे ३० शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक संस्थातील तीन हजार युवा सहभागी होत आहेत. यामध्ये शिक्षण कला आणि क्रीडा उपक्रमाचा प्रामुख्याने समावेश असून गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती खाते तसेच क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याच्या सहाय्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त कोईकारांनी या उपक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन परिक्रमा ०.५ च्या मुख्य सचिव उर्वशी नाईक यांनी केले आहे.