‘या’ दिवशी होणार ग्लोबल स्पाय सीरीज ‘सिटाडेल’ प्रदर्शित…
अमेझॉन प्राइम व्हिडिओने आपल्या अॅक्शन-पॅक्ड स्पाय थ्रिलर सिटाडेल सिरीजचे फर्स्ट-लूक फोटो जारी करत, रोमांच आणि उत्साहाने भरपूर असलेल्या या सिरीजच्या 2 एपिसोडचा एक्सक्लूसिव प्रीमियर शुक्रवार दिनांक 28 एप्रिल रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर होईल अशी घोषणा केली आहे. तसेच, यानंतर 26 मे पर्यंत दर शुक्रवारी एक नवीन एपिसोड प्रदर्शित केला जाईल. रुसो ब्रदर्स AGBO आणि शो-रनर डेव्हिड वील या लँडमार्क, हाय-टेक ड्रामाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत ज्यामध्ये, स्टेनली टुकी आणि लेस्ली मॅनव्हिल यांसह रिचर्ड मॅडन आणि प्रियांका चोप्रा जोनास यांनी मुख्य व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. अशातच, ‘सिटाडेल’ही सिरीज जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमधील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध होईल.
do you C what’s hiding in front of your eyes?
— prime video IN (@PrimeVideoIN) February 27, 2023
the first look at @CitadelOnPrime starring @_richardmadden, @priyankachopra, Stanley Tucci, and Lesley Manville#CitadelOnPrime, Apr 28 pic.twitter.com/baT5fgKFm8
या सिरीजमध्ये मेसन केनच्या भूमिकेत रिचर्ड मॅडेन, नादिया सिंगच्या भूमिकेत प्रियांका चोप्रा जोनास, बर्नार्ड ऑरलिकच्या भूमिकेत स्टॅन्ली टुकी, डहलिया आर्चरच्या भूमिकेत लेस्ली मॅनव्हिल, कार्टर स्पेन्सच्या भूमिकेत ओसी इखिले, एब्बी कॉनरॉयच्या भूमिकेत ऍशले कमिंग्स, एंडर्स सिल्जेच्या भूमिकेत रोलँड मोलर आणि डेविक सिल्जे, आणि काओलिन स्प्रिंगल हेंड्रिक्सने कॉनरॉयची भूमिका साकारली आहे.
अमेझॉन स्टुडिओज आणि रुसो ब्रदर्स AGBO च्या सिटाडेलमध्ये AGBO साठी अँथनी रुसो, जो रुसो, माईक लारोका, अँजेला रुसो-ओटस्टोट आणि स्कॉट नेम्स हे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत, डेव्हिड वील शोरनर आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करत आहेत. तसेच, जोश ऍपलबॉम, आंद्रे नेमेक, जेफ पिंकनर आणि स्कॉट रोझेनबर्ग मिडनाइट रेडिओसाठी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करत आहेत. न्यूटन थॉमस सिगेल आणि पॅट्रिक मोरन देखील एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करत आहेत.