google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

IFFI 53 : एफटीआयआयच्यावतीने दिव्यांगांसाठी मोफत अभ्यासक्रम

पणजी:

एफटीआयआय म्हणजेच फिल्म अॅंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या पुण्याच्या संस्थेने सेंटर फॉर ओपन लर्निंग (सीएफओएल) या उपक्रमाअंतर्गत नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएफडीसी) आणि एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) यांच्या सहकार्याने आगामी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महेात्सवाच्या 53 व्या आवृत्तीमध्ये म्हणजे इफ्फी 53 मध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी दोन विनामूल्य अभ्यासक्रम जाहीर केले आहेत. इफ्फी 53 चे गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर या काळात आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये ऑटिझम असलेल्या लोकांसाठी स्मार्टफोन फिल्म मेकिंगचा मूलभूत अभ्यासक्रम आणि व्हीलचेअरचा वापर करणा-यांसाठी स्क्रीन अॅक्टिंगचा मूलभूत अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.

कला निर्मितीची प्रक्रिया सर्वांना सुलभ व्हावी, असा उद्देश दिव्यांग व्यक्तींना हे अभ्यासक्रम शिकविण्यामागे आहे. एफटीआयआयच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमामुळे दिव्यांगांना सिनेमा निर्मितीची जादू काय असते, हे समजावे, त्यामध्ये सहभागी होता यावे, आणि त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी त्यांना सक्षम बनवावे, यासाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे नियोजन केले जाते. इफ्फी 53 मधील हे अभ्यासक्रम 8 दिवसांचे आहेत. 21 ते 28 नोव्हेंबर या काळात दिव्यांगांना शिकवले जाणार आहे. तसेच यंदा आधुनिक काळातील लेखक बनविण्याच्या उद्देशानेही एक अभ्यासक्रम ठेवण्यात आला आहे. तर त्यांच्यामध्ये आत दडलेल्या कलाकाराला मुक्त करणारा दुसरा अभ्यासक्रम आहे.

ऑटिझम असलेल्या व्यक्तींना स्मार्टफोनच्या मदतीने चित्रपट बनविण्याचे मूलभूत शिक्षण देण्यात येणार असून, हा अभ्यासक्रम व्हिज्युअल कम्युनिकेशन क्षेत्रातले नामवंत अजमल जामी शिकवणार आहेत. युद्ध क्षेत्रापासून ते माहितीपट, जाहिरात पट, सॉफ्ट फीचर्स आणि कार्यक्रम अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अजमल जामी यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सिनेमॅटोग्राफर, फिल्ममेकर आणि फोटोग्राफर म्हणून त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संस्थांबरोबर मोठ्या प्रकल्पांवर काम केले आहे.

या अभ्यासक्रमामध्ये चित्रपटाची भाषा कशी असते, त्याचा परिचय देण्यापासून ते स्मार्टफोनच्या मदतीने चित्रीकरण आणि संपादन करण्यापर्यंत अनेक गोष्टीं शिकवल्या जाणार आहेत. या विभागामध्ये अखेरीस स्क्रीनिंग आणि आढावा घेण्याचे सत्र ठेवले आहे. इच्छुकांनी अधिक तपशील आणि नाव नोंदणीसाठी एफटीआयआयच्या अधिकृत संकेतस्थळावर पुढील लिंकव्दारे संपर्क साधावा.

व्हीलचेअर वापरणा-या व्यक्तींसाठी स्क्रीन अॅक्टिंगचा मूलभूत अभ्यासक्रम जिजॉय पी. आर. हे शिकवणार आहेत. ते एफटीआयआयमध्ये अधिष्ठाता (फिल्म) आणि असोसिएट प्रोफेसर आहेत. रंगभूमी कलाकार, चित्रपट अभिनेता, प्रशिक्षक आणि निर्माते जिजॉय यांनी 55 चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि विविध 4 खंडांमध्ये आंतरराष्ट्रीय थिएटरमध्ये जवळपास 400 नाटकांमध्ये काम केले आहे.

अभिनयाच्या अभ्यासक्रमाचे 6 विभाग केले आहेत. अभ्यासक्रमाचा प्रारंभ नाट्यशास्त्राच्या परिचयाने होणार आहे. या अभ्यासक्रमात कॉमेडी म्हणजेच हास्यरस शिकविण्यावर भर दिला जाणार आहे. हालचाल, अभिनयाचे खेळ आणि संवेदना जागृत करण्यासाठी विशेष कलाप्रकार शिकवताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष वेधून कशा प्रकारे लोकांचे मनोरंजन करता येवू शकते, याचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. इच्छुकांनी अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आणि नाव नोंदणीसाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी.

प्रस्तूत दोन्ही अभ्यासक्रम गोव्यातील मॅक्विनेझ पॅलेस येथील कलादालनामध्ये घेण्यात येणार आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!