इंडियन पॅनोरमावर दाक्षिणात्य सिनेमांचे वर्चस्व…
नवी दिल्ली :
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) एक मुख्य घटक असलेल्या ‘इंडियन पॅनोरमा’अंतर्गत दाखवल्या जाणार असलेल्या 25 फिचर फिल्म्स आणि 20 नॉन फिचर फिल्म्सची घोषणा आज करण्यात आली. सात मल्याळम, पाच तमिळ, दोन कन्नड सिनेमांसह दाक्षिणात्य सिनेमांनी यावर्षी इंडियन पॅनोरमावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आनंद एकार्शी दिग्दर्शित ‘अट्टम’ या मल्याळम सिनेमाने यावर्षी पॅनोरमा विभागाचे उदघाटन होणार आहे.
बारा सदस्यांचा समावेश असलेल्या यंदाच्या या फीचर फिल्म ज्युरींचं नेतृत्व, निवड समितीचे अध्यक्ष, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता डॉ. टी. एस. नागभरणा यांनी केलं.
54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) इंडियन पॅनोरमा विभागातल्या फिचर फिल्मच्या वर्गवारीकरता एकूण 408 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून वैशिष्ट्यपूर्ण 25 चित्रपटांचे पॅकेज निवडण्यात आले आहे. निवडलेले हे 25 चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या बहुरंगी आणि विविधतेचे दर्शन घडवणारे चित्रपट आहेत.
इंडियन पॅनोरमा 2023 अंतर्गत फिचर फिल्मस वर्गवारीसाठी निवड झालेल्या चित्रपटांची यादी :
अट्टम, इरट्ट, काथल, मल्लिकापुरम , ना थान केस कोडु, पुकलम, २०१८ : एव्हरीव्हन इज या हिरो, (मल्याळम)
कांतारा, अरारिराओ (कन्नड),
अर्धांगिनी, डीप फ्रिज, रबिन्द्र काव्य रहस्य (बंगाली)
ढाई आखर, मंडली, सना, द वॅक्सीन वॉर, वध, गुलमोहर, सिर्फ एक बंदा काफी है, द केरला स्टोरी (हिंदी),
काधल इंबथू पोथू उदमई, नील नीरा सुरियान, विदुथलै-१, पोन्नीयन सेल्वन-२, (तमिळ)
मिरबीन (कार्बी)
त्याचप्रमाणे यंदाच्या इंडियन पॅनोरमातील नॉन फीचर फिल्म विभागात १८ लघुपट- माहितीपटांची निवड करण्यात आली आहे. सहा सदस्यांचा समावेश असलेल्या नॉन फीचर फिल्म ज्युरींचं नेतृत्व प्रख्यात माहितीपट दिग्दर्शक अरविंद सिन्हा यांनी केलं. सुयश कामत दिग्दर्शित ‘सदाबहार’च्या माध्यमातून कोंकणी लघुपटाने आपली वर्णी लावली आहे.
तर, नॉन फिचर फिल्म्स या वर्गवारीचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून निवड समितीनं कुमारी लाँगजाम मीना देवी दिग्दर्शित ‘एंड्रो ड्रीम्स’ या मणिपुरी चित्रपटाची एकमतानं निवड केली आहे.
इंडियन पॅनोरमा 2023 अंतर्गत लघुपट वर्गवारीसाठी निवड झालेल्या चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे :
सदाबहार (कोंकणी)
ब्रेक्झिट इंडिया, बॅक टू द फ्युचर (इंग्लिश)
अँड्रो ड्रीम्स, लास्ट मीट (मणिपुरी)
बासन, बहुरुपिया, गिद्ध (हिंदी)
बरुर जॉन्गसार, कथाबोर, लछित (आसामी)
भंगार (मराठी)
नान्सेई नीलम (तमिळ)
चुपी रोह (डोगरी)
लाईफ इन लूम (हिंदी, तमिळ, आसामी, बंगाली, इंग्लिश)
माऊ : द स्पिरिट ड्रीम्स ऑफ चेराय (मिझो)
प्रदक्षिणा, उत्सवमूर्ती (मराठी)
श्री रुद्रम (मल्याळम)
द सी अँड सेव्हन व्हिलेज (उडिया)