सलमाननंतर रिद्धी डोगरा दिसणार आता शाहरुखसोबत…
ऍटली कुमारच्या दिग्दर्शनाची घोषणा झाल्यापासून, चित्रपटाबद्दल बरीच चर्चा आहे. ‘जवान’या चित्रपटाची चर्चा सर्वत्र रंगात असतानाच, चित्रपटात पाहायला मिळणाऱ्या कलाकारांमध्ये आता भर पडली आहे, कारण आता रिद्धी डोगरा शाहरुख खानच्या ‘जवान’या पॅन इंडिया चित्रपटात दिसणार आहे. विजय सेतुपती, नयनतारा सारखे भारतातील दिग्गज अभिनेते मुख्य भूमिकेत दिसणार असून, रिद्धी डोगरा देखील चित्रपटाचा मुख्य भाग असल्याचे सांगितले जाते.
‘मॅरिड वुमन’ आणि ‘असुर’ यांसारख्या ओटीटी शोजमध्ये काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेली रिद्धी डोगरा ‘जवान’च्या कलाकारांमध्ये सामील झाल्याचं कळतं. ती महत्त्वाची भूमिका साकारणार असून, अधिक तपशील सस्पेन्स राखण्यासाठी गुपित ठेवण्यात आले आहे. रिद्धी डोगरा एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत दिसणार असून, तिने आपल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.
एका सूत्राने खुलासा केला की, “रिद्धी डोगरा यांनी यापूर्वीच मुंबई आणि चेन्नईमध्ये जवानासाठी शूटिंग केले आहे. ती एक प्रतिभावान कलाकार आहे आणि तिने या चित्रपटात कौतुकास्पद काम केले आहे. तिला एका नव्या व्यक्तिरेखेत पाहणे कौतुकास्पद ठरेल.”