राहुल गांधीना दोन वर्षांची शिक्षा
मोदी आडनावाचे सर्वजण चोर कसे असतात? कर्नाटकच्या कोलारमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यावरून आता त्यांना दोषी ठरवत सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सन 2019 साली राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर गुजरातचे त्यावेळचे मंत्री पुर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीची याचिका दाखल केली होती.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कोलार येथे रॅली दरम्यान राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं होतं. भारतीय दंड संहिता कलम 499 आणि 500 अंतर्गत राहुल गांधींना दोषी ठरवणाऱ्या मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयानेही त्यांना जामीन मंजूर केला आणि उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा देण्यासाठी 30 दिवसांची शिक्षा स्थगित केली.
भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. पूर्णेश मोदी हे भूपेंद्र पटेल सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री होते आणि सुरत पश्चिम विधानसभेचे आमदार आहेत. सुरतमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गांधींना ताकद आणि समर्थन देण्यासाठी एकत्र आले.
गांधींचे वकील किरीट पानवाला यांनी सांगितले की, न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंच्या अंतिम युक्तीवादावर सुनावणी पूर्ण केली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये राहुल गांधींनी या खटल्याप्रकरणी सुरत न्यायालयात हजेरी लावली होती.
राहुल गांधी यांच्या वैयक्तिक हजर राहण्याची मागणी करणाऱ्या तक्रारदाराच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने कारवाईवरील स्थगिती रद्द केल्यानंतर अंतिम युक्तिवाद गेल्या महिन्यात पुन्हा सुरू झाला.
दरम्यान, राहुल गांधींच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की न्यायालयीन कार्यवाही सुरुवातीपासूनच दोषपूर्ण होती कारण CrPC (कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर) च्या कलम 202 अंतर्गत असलेली प्रक्रिया पाळली जात नव्हती