OPPO चा हा फोल्डेबल फोन पाहिलात का?
ओप्पो या आघाडीच्या जागतिक स्मार्ट डिवाईसेस ब्रॅण्डने भारतात८९,९९९ रूपये किंमत असलेला त्यांचा फ्लॅगशिप फाइण्ड एन२ फ्लिपच्या उपलब्धतेची घोषणा केली. हा स्मार्टफोन १७ मार्च रात्री १२ वाजल्यापासून OPPO Stores, Flipkart व मेनलाइन रिटेल आऊटलेट्समध्ये उपलब्ध असेल. ग्राहकांना हा नवीन स्मार्टफोन कॅशबॅक्स व इन्सेंटिव्ह्जच्या माध्यमातून ७९,९९९ रूपये इतक्या कमी किंमतीत मिळू शकतो.
या डिवाईसबाबत ओप्पो इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर दमयंत सिंग खनोरिया म्हणाले, ‘‘आम्हाला उद्देशपूर्ण प्रगत वैशिष्ट्ये सादर करण्याचा ओप्पोचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा अभिमान वाटतो आणि आमचे नवीन इनोव्हेशन फाइण्ड एन२ फ्लिपच्या लॉन्चची घोषणा करण्याचा आनंद होत आहे. या स्लीक डिवाईसमध्ये मोठे व्हर्टिकल कव्हर स्क्रिन, अदृश्य क्रीज, शक्तिशाली कॅमेरे आणि दर्जात्मक बॅटरी क्षमता आहे, ज्यामुळे हा डिवाईस स्टाइल, कार्यक्षमता व टिकाऊपणाला महत्त्व देणाऱ्यांसाठी परिपूर्ण निवड आहे. आम्हाला विश्वास आहे की, हा फ्लिप स्मार्टफोन भारतासह जगभरात फोल्डेबल स्मार्टफोन श्रेणीमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणेल.’’
ओप्पोचा पदार्पणीय फ्लिप फोन नवीन फ्लेक्सिअन हिंज डिझाइनसह श्रेणीसाठी बेंचमार्क स्थापित करतो. ही डिझाइन वॉटर ड्रॉप फोल्ड तयार करते, ज्यामधून इतर कोणत्याही फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या तुलनेत मुख्य डिस्प्लेवर लक्षणीयरित्या उथळ, अरूंद क्रीज तयार होते. ही क्रीज परिपूर्ण फ्लॅट-स्क्रिन अनुभवासाठी बहुतांश प्रकाश स्थितींमध्ये अदृश्य दिसते.
दर्जात्मक हिंज टिकाऊपणाच्या बाबतीत तडजोड करत नाही.ओप्पो फाइण्ड एन२ फ्लिप ४,००,००० फोल्ड्स व अनफोल्ड्स सहन करण्यासाठी थर्ड-पार्टी टीयूव्ही -हेनलँडद्वारे प्रमाणित आहे, जे दहा वर्षांहून अधिक काळासाठी दररोज फोन १०० वेळा उघडणे व बंद करण्याइतके आहे.
९५ टक्के आर्द्रतेसह -२० अंश सेल्सिअस ते ५० अंश सेल्सिअसपर्यंतच्या प्रखर स्थितींमध्ये १,००,००० हून अधिक फोल्ड व अनफोल्ड चक्रांसाठी देखील स्मार्टफोनची चाचणी करण्यात आली आहे.
ओप्पो आपल्या हिंज वैशिष्ट्यावर अधिक भर देते, कारण या वैशिष्ट्याचा इतर वैशिष्ट्यांवर परिणाम होतो. डिवाईसवरील अत्यंत बारकाईने निर्माण करण्यात आलेल्या हिंजमुळे ओप्पो डिवाईसवर मोठी ३.२६ इंच कव्हर स्क्रिन आहे, ज्यामध्ये १७:९ व्हर्टिकल लेआऊटसह फोनचा ४८.५ टक्के भाग आहे.
या डिस्प्लेमधून सर्वसमावेशक नवीन युजर अनुभव मिळण्यासोबत फोटोज व व्हिडिओजचे प्रीव्ह्यूज, टाइमर्स व सिस्टम सेटिंग्ज सारखे टूल्स जलद उपलब्ध होण्याची सुविधा मिळते. तसेच वापरकर्ते ऑल्वेज-ऑन नोटिफिकेशन्स, संदेशांना त्वरित प्रतिक्रिया आणि इंटरअॅक्टिव्ह डिजिटल पेट्ससाठी कव्हर डिस्प्ले सानुकूल करू शकतात.
ओप्पो फाइण्ड एन२ फ्लिपमध्ये पॉलिश केलेल्या अॅल्युमिनिअम साइड्स व मॅट ग्लास बॅक आहे, जे कडांवरील वक्र भागांवर अत्यंत सौम्य आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोन हातामध्ये धरण्यास व वापरण्यास अत्यंत आरामदायी आहे. या स्मार्टफोनचे वजन फक्त १९१ ग्रॅम आहे आणि फ्लिप खुले केल्यास ७.४५ मिमी स्लिम आहे.
तसेच स्मार्टफोनचे मोठे ६.८ इंच ई६ एएमओएलईडी डिस्प्ले परिपूर्णपणे समायोजित केलेले आहे, ज्यामुळे तुम्ही मल्टीमीडिया व गेम्सचा आनंद घेऊ शकता. यामधील सिनेमॅटिक २१:९ अॅस्पेक्ट रेशिओ आणि १६०० नीट्स ब्राइटनेस सर्वोत्तम चित्रपट पाहण्याची खात्री देतात, तर यामधील १२० हर्टझ रिफ्रेश रेट सुलभ युजर अनुभव देते.
या डिवाईसमध्ये फ्लॅगशिप-लेव्हल कॅमेरा सिस्टम आहे, ज्यामध्ये हाय-रिझॉल्युशन कॅमेरा सेन्सर्ससह अंधुक प्रकाशात ४के व्हिडिओग्राफीसाठी ओप्पोचे इन-हाऊस मॅरिसिलिकॉन एक्स एनपीयू आहे. आपल्या इमेजिंग क्रेडेन्शियल्समध्ये अधिक वाढ करण्यासाठी ओप्पोने हॅसलब्लॅडसह सहयोगाने काम करत कॅमेरा सिस्टममध्ये हॅसलब्लॅड नॅच्युरल कलर सोल्यूशन (एचएनसीएस)चा समावेश केला आहे. सातत्यूपर्ण व अचूक परिणाम देण्याकरिता रंगामधील अचूकता, टोन व कॉन्ट्रास्ट सानुकूल करण्यासाठी शटर बटन प्रेस करताच अद्वितीय कलर-प्रोसेसिंग सिस्टम कार्यान्वित होते. वापरकर्ते प्रोफेशनल हॅसलब्लॅड अॅम्बेसेडर्सनी डिझाइन केलेले इमरॅल्ड, रॅडियन्स व सेरेनिटी या तीन अतिरिक्त फिल्टर्ससह फोटोग्राफ्स अधिक सुधारू शकतात.
ओप्पो फाइण्ड एन२ फ्लिपवरील ५० मेगापिक्सल सोनी आयएमएक्स८९० प्रायमरी सेन्सरमध्ये ऑल-पिक्सल ओम्नीडायरेक्शनल इंटेजिण्ट फोकसिंग आहे, ज्यामुळे जवळच्या वस्तू शार्प दिसतात, तर पार्श्वभूमी सॉफ्ट दिसते, फोटोज टेक्स्चर्ड, डायनॅमिक व सविस्तर दिसतात.
हँडसेटमध्ये ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सोनी आयएमएक्स३५५ रिअर स्नॅपरसह व्यापक फिल्ड ऑफ व्ह्यू आहे, जे फोटो व व्हिडिओंसाठी परिपूर्ण आहे. सेल्फीसाठी यामध्ये ३२ मेगापिक्सल सोनी आयएमएक्स०९ फ्रण्ट शूटर आहे.