‘फादर्स डे’साठी ‘टाटा’चे अनोखे डिजिटल कॅम्पेन…
मुंबई:
आपल्या मुलांना संरक्षण पुरवण्यासाठी वडील सर्वतोपरी प्रयत्नशील असतात, मार्गात कितीही अडीअडचणी आल्या तरी त्या दूर सारून आपल्या मुलांचे संरक्षण करणे हे प्रत्येक वडील स्वतःचे परम कर्तव्य मानतात आणि ते कर्तव्य पूर्ण करण्याची जादू त्यांच्या पाकिटात असते. यंदाच्या फादर्स डेच्या निमित्ताने भारतातील एक आघाडीची जीवन विमा कंपनी टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने (टाटा एआयए) एक विशेष डिजिटल कॅम्पेन सादर केले आहे ‘जादुई पॉकेट का सिक्रेट’ वडील आपल्या मुलांची स्वप्ने कशी पूर्ण करू शकतात याचे खरे गुपित यामध्ये उघड करण्यात आले आहे.
आपल्या कुटुंबातील प्रियजनांप्रती जबाबदाऱ्या पूर्ण करताना आर्थिक बाजू मजबूत असणे महत्त्वाचे असल्याचे या कॅम्पेन फिल्ममध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. या फिल्ममध्ये एक मुलगा दाखवण्यात आला आहे ज्याने आपल्या वडिलांना त्यांच्या जादुई पाकिटातून त्याची सर्व स्वप्ने पूर्ण करताना पाहिले आहे, सायकल असो किंवा आवडत्या ठिकाणी फिरायला जाणे असो किंवा एमबीएचे शिक्षण असो त्या मुलाचे वडील त्याच्या सर्व इच्छा स्वतःच्या पाकिटातून पूर्ण करतात. आता हा मुलगा स्वतः बाबा बनतो तेव्हा त्याचे वडील त्याला जादुई पाकिटाचे खरे गुपित सांगतात. फॉररेस्ट फिल्म्सने तयार केलेल्या या फिल्ममध्ये भारतातील एक अतिशय प्रसिद्ध अभिनेता रजत कपूर यांनी वडिलांची भूमिका केली आहे.
लहान वयात आपल्याला पैशाचा खरा अर्थ समजत नाही, त्यावेळी आपल्याला नेहमीच असे वाटत राहते वडिलांकडे काहीतरी जादू आहे जी वापरून ते आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. वडिलांचे पैसे त्यांच्या शर्टाच्या खिशात अर्थात पाकिटात ठेवलेले असतात, त्यावरून ‘जादुई पाकिटाची’ कल्पना सुचली जी या फिल्मचा विषय बनली. या कल्पनेवर भर देण्यासाठी फिल्ममध्ये जेव्हा जेव्हा वडील आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या पाकिटाला स्पर्श करतात तेव्हा त्यामधून जादू बाहेर येताना दाखवली आहे. टाटा एआयएच्या फॉर्च्युन गॅरंटी प्लस सेविंग्स प्लानसोबत ही जादू घडून येणे शक्य आहे या संदेशासह ही फिल्म संपते. टाटा एआयएच्या फॉर्च्युन गॅरंटी प्लस सेविंग्स प्लानमध्ये पॉलिसीच्या संपूर्ण अवधीमध्ये गॅरंटीड नियमित उत्पन्न मिळत राहते.
फिल्मविषयी अधिक माहिती देताना टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सचे चीफ मार्केटिंग ऑफिसर गिरीश कालरा यांनी सांगितले, “कुटुंबातील कमावती व्यक्ती म्हणून वडील आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली जावी यासाठी अनेक वेगवेगळे त्याग जराही न बोलता करत असतात. आणि म्हणूनच वडील आपले पहिले सुपरहिरो असतात, प्रेम, काळजी, खंबीर साथ आणि आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट वडील पुरवतात. आपल्या सर्वांच्या लहानपणीच्या आठवणींना जागे करणारी ही फिल्म मनाला स्पर्श करते. या फिल्ममध्ये आम्ही सर्व बाबांविषयी आदर व्यक्त करू इच्छितो जे आपल्या मुलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी अथक मेहनत करत असतात. आमचा गॅरंटीड इन्कम प्लान प्रत्येक वडिलांसाठी सुयोग्य आर्थिक नियोजनामार्फत मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अतिशय योग्य आहे.”