
अपोलोने ७८ बोन मॅरो ट्रान्सप्लांट्स केले पूर्ण
नवी मुंबई :
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने प्रगत बोन मॅरो (अस्थिमज्जा) ट्रान्सप्लान्ट प्रक्रियांमध्ये आपली उल्लेखनीय कामगिरी कायम राखत ७८ ट्रान्सप्लांट्स करून महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. या रुग्णालयाने दीर्घकालीन सफलता दर ७०% पेक्षा जास्त नोंदवला आहे. दुसऱ्या देशांमधून आलेल्या रुग्णांबरोबरीने लहान मुले आणि वयस्क अशा दोन्ही रुग्णांवर याठिकाणी यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. त्यांचे हे यश उच्च दर्जेदार, जीवन रक्षक ट्रान्सप्लांट सेवा प्रदान करण्यात अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे नेतृत्व स्थान अधोरेखित करते.
ल्युकेमिया, थॅलेसेमिया, सिकल सेल आजार, गंभीर अप्लास्टिक ऍनिमिया, मल्टिपल मायलोमा, मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम आणि काही दुर्मिळ प्रकारच्या इम्युनोडेफिशियन्सीसारख्या स्थितींमध्ये गुंतागुंतीची मेडिकल आव्हाने असतात आणि दीर्घकालीन रिकव्हरीसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन सारख्या प्रगत उपचारांची गरज असते. बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशनच्या आधी कंडिशनिंगची गरज असते आणि ट्रान्सप्लान्टेशनच्या नंतर रोगप्रतिकार शक्तीची रिकव्हरी खूप धीम्या गतीने होते, त्यामुळे या रुग्णांना संसर्ग आणि इतर गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो.
जेव्हा बोन मॅरो पुरेशा प्रमाणात निरोगी रक्तपेशींचे उत्पादन करू शकत नाही तेव्हा बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन प्रक्रिया करून तो बोन मॅरो बदलला जातो.अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन युनिट ऑटोलॉगस, हेप्लोइडेंटिकल आणि एलोजेनिक ट्रान्सप्लान्टसह नवीन CAR T- cell थेरपी करण्यासाठी सुसज्जित आहे. आपल्या रुग्णकेंद्रित दृष्टिकोनामुळे हे हॉस्पिटल फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही नावाजले जाते.
डॉ पुनीत जैन, कन्सल्टन्ट हेमॅटोलॉजी, हेमॅटो-ऑन्कोलॉजी आणि प्रोग्राम कोऑर्डिनेटर बीएमटी आणि CAR T cell थेरपी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले,”अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये आम्ही गुंतागुंतीच्या आणि भरपूर जोखीम असलेल्या बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन प्रक्रिया करत आहोत, ज्यांचा सफलता दर ७०% पेक्षा जास्त आहे आणि हा दर जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित बीएमटी केंद्रांच्या सफलता दराच्या तोडीस तोड आहे. या रुग्णांमध्ये ट्रान्सप्लान्टनंतर इम्यून रिकव्हरी खूप धीम्या गतीने होते, त्यामुळे संसर्ग आणि इतर गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका असतो, पण आमचे संसर्ग नियंत्रणाचे उत्कृष्ट प्रोटोकॉल आणि प्रशिक्षित टीम्स सर्वोत्तम परिणाम मिळवून देतात. त्याखेरीज, आम्ही इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लान्टेशन रजिस्ट्रीचा एक भाग आहोत, जिथे त्यांच्या सर्व रजिस्टर्ड सेंटर्समध्ये उपचार करण्यात आलेले आजार आणि त्यामध्ये मिळालेले परिणाम यांच्या स्पेक्ट्रमचे मोजमाप केले जाते. आमच्या CAR T cell थेरपी क्षमता आणि ट्युमर बोर्डवर आधारित उपचार प्रोटोकॉल आमच्या रुग्णांना सर्वात प्रगत, पुराव्यांवर आधारित उपचार प्रदान करण्याची आमची बांधिलकी दर्शवतात.”
डॉ विपीन खंडेलवाल, पीडियाट्रिक हेमॅटो ऑन्कोलॉजी आणि बीएमटी कन्सल्टन्ट, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले,”पीडियाट्रिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट्ससाठी प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी उच्च दर्जेदार पायाभूत सुविधांसह बहूविषयक दृष्टीकोनाची आवश्यकता असते. ल्युकेमिया, थॅलेसेमिया, सिकल सेल आजार, गंभीर अप्लास्टिक ऍनिमिया, मल्टिपल मायलोमा, एमडीएसपासून चेडियाक हिगाशी सिंड्रोमसारख्या दुर्मिळ केसेसपर्यंत रक्ताशी संबंधित विकारांच्या संपूर्ण स्पेक्ट्रमचे व्यवस्थापन आम्ही यशस्वीपणे करतो, ही बाब अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये आमचे असामान्य टीमवर्क आणि नैपुण्याचे प्रमाण आहे. रक्ताशी निगडित गंभीर आजारांनी त्रस्त मुलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही बांधील आहोत.”
नवी मुंबईच्या एका १४ वर्षांच्या मुलीच्या पालकांनी आपला अनुभव सांगितला, “ल्युकेमिया हा शब्द ऐकताच आमचा श्वास रोखला गेला, आम्हाला आमच्या मुलीची खूप काळजी वाटत होती. पण अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या डॉक्टरांनी उत्कृष्ट वैद्यकीय देखभाल प्रदान केली, इतकेच नव्हे तर, आमच्या मुलीच्या उपचारांच्या प्रत्येक आव्हानात्मक टप्प्यावर ते आमच्यासोबत उभे होते. आमची लेक बरी होण्यामध्ये त्यांची समर्पित वृत्ती आणि त्यांनी घेतलेली तिची काळजी यांचे योगदान खूप मोलाचे आहे. आज आमची मुलगी सामान्य जीवन जगण्यासाठी सक्षम आहे. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या डॉक्टरांचे आणि कर्मचाऱ्यांचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.”