‘मेड इन हेवन 2′ चा हा ट्रेलर पाहिलात का?
प्राइम व्हिडियो या भारतातील सर्वात लोकप्रिय एंटरटेनमेंट डेस्टिनेशनतर्फे आज ‘मेड इन हेवन’ या ॲमेझॉन ओरिजिनल सीरीजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर सादर करण्यात आला. इंटरनॅशनल एमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळालेल्या या शोमध्ये भारतीय लग्नसमारंभांमधील परंपरा, आधुनिक महत्त्वाकांक्षा आणि सामाजिक रुढी यांच्यातील विरोधाभास दाखविण्यात आला आहे.
यामध्ये शोभिता धुलिपाला, अर्जुन माथुर, जिम सर्भ, कल्की कोचलिन, शशांक अरोरा, शिवानी रघुवंशी आणि विजय राज या कलाकारांसोबतच मोना सिंग, इश्वाक सिंग आणि त्रिनेत्रा हलदर हे चेहरेही पाहायला मिळणार आहेत. या सीरीजचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव, नीरज घेवान, नित्या मेहरा, रीमा कागटी आणि झोया अख्तर यांनी केले आहे तर रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांची एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट आणि झोया अख्तर व रीमा कागटी यांची टायगर बेबी यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. सीरिज भारत आणि जगभरातील 240 देश व प्रातांमध्ये या 7 एपिसोड्सच्या सीरिजचा एक्सक्लुझिव्ह प्रीमिअर होणार आहे.
‘मेड इन हेवन’ सीझन 2 मध्ये ताराच्या भूमिकेत परतल्याचा मला खूप आनंद झाला आहे. माझ्यासाठी ताराचा प्रवास हा विलक्षण आणि आव्हानात्मक आहे. कारण आदिल आणि फैझासोबत आपले वैयक्तिक आयुष्य जगत असतानाच दुसरीकडे भव्य लग्नसमारंभांचे नियोजनही करत असते.”, *अशा भावना शोभिता धुलिपालाने व्यक्त केल्या.* “दुसऱ्या सीझनचे चित्रीकरण करताना खूपच मजा आली आणि हा सीझन अजून जास्त प्रेक्षकांना भावेल, अशी मला खात्री आहे. आधीच्या सीझनमुळे प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचे, किंबहुना त्याहून चांगली करण्याचा थोडासा दबाव असतो, पण मी याबद्दल सकारात्मक आहे. ‘मेड इन हेवन’ सीझन 2 प्रेक्षकांना निश्चितच आवडेल आणि मानवी अस्तित्वाच्या गुंतागुंतींविषयी चर्चा होईल आणि हा एक अविस्मरणीय व विचारांना चालना देणारा अनुभव असेल, अशी माझी खात्री आहे.”
आपला उत्साह व्यक्त करताना अर्जुन माथुर म्हणाला, “पूर्वी साकारलेल्या व्यक्तिरेखा प्रवास पुन्हा एकदा जगणे आणि त्या व्यक्तिरेखेसह वेगळी लय पकडणे आणि वेगळा आयाम दाखविणे हा एक छान प्रवास आहे. ‘मेड इन हेवन’मध्ये करणचे पात्र साकारणे हा एक परिवर्तनकारी अनुभव होता. पहिल्या सीझनला मिळालेली लोकप्रियता आणि ओळख, तसेच इंटरनॅशनल एमी पुरस्कारांमध्ये नामांकन हे खूपच सद्गदित करणारे होते. सीझन 2 करण या व्यक्तिरेखेला एका नव्या उंचीवर घेऊन जातो. एकीकडे सामाजिक समस्यांना सामोरे जाताना ही व्यक्तिरेखा उच्चभ्रू लग्नसोहळ्यांचा एक भाग होत असते. करणच्या प्रवासाबद्दल आणि त्याच्या आयुष्यातील अनपेक्षित घटनांबद्दल प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया येतात हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. प्रस्थापित रुढींना आव्हान देणाऱ्या आणि भव्य समारंभांमध्ये आनंद शोधणाऱ्या करणचा भावनिक प्रवास या सीझनमध्ये पाहता येणार आहे. या शोमध्ये लग्नसमारंभांत आनंदाच्या आवरणाच्या आत घडणारे खरे प्रसंग उलगडणार आहेत.”
जिम सर्भ म्हणाला, “आदिल खन्नाची व्यक्तिरेखा साकारणे हा खूप छान अनुभव होता. याचे मुख्य कारण म्हणजे या निमित्ताने मला अलंकृता, नीरज, नित्या, रीमा, झोया, निकोस अँड्रत्साकीज, तनय साटम, डीओपी आणि अत्यंत गुणवान टीम, दिग्दर्शक आणि निर्मितीच्या टीमसह काम करण्याची संधी मिळाली. अनेक पदर असलेली आणि काहीशी अगम्य व्यक्तिरेखा साकारताना फार मजा आली. भारत आणि भारताबाहेरही या व्यक्तिरेखेला खूप लोकप्रियता मिळाली आहे.
सीझन 2 मध्ये अदिलला नुकसान, प्रेम आणि एकनिष्ठतेला सामोरे जावे लागणार आहे आणि काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. अदिलच्या निर्णयांचा काय परिणाम होतो आणि या पात्रात या सीझनमध्ये काय बदल होणार आहे, हे पाहणे रोचक ठरणार आहे. समीक्षकांकडून गौरविलेल्या शोचा एक अविभाज्य भाग असणे ही बाब निश्चितच आनंद देणारी आहे आणि या नव्या सीझनलाही जगभरातून तितकेच प्रेम आणि लोकप्रियता लाभेल, अशी मला आशा आहे.”
https://twitter.com/PrimeVideoIN/status/16
सीझन 1 च्या शेवटी, या सीरीजमधील प्रमुख पात्रे एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली होती. तिथूनच ‘मेड इन हेवन’चा दुसरा सीझन सुरू होतो. नवीन वधु आणि नव्या आव्हानांसह आपले आवडते वेडिंग प्लॅनरर्स त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यातील चढउतारांना सामे जातात. ‘मेड इन हेवन’चा दुसरा सीझनही अधिक भव्य, रोमान्स, नाट्य, लग्नसमारंभांनी भरलेला असणार आहे. यात काही ओळखीचे आणि काही नवीन चेहरे आणि खिळवून ठेवणारे कथानक आहे. इंटरनॅशनल एमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळालेल्या शोच्या या नव्या सीझनमध्ये यातील व्यक्तिरेखांच्या आयुष्यात अधिक खोल जाण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लग्नसमारंभ आयोजित करण्याच्या आणि साजरे करण्याच्या किचकट प्रक्रियेतून या व्यक्तिरेखा जात असतात तर दुसरीकडे त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित घटना घडत असतात.