IFFI Goa 2023: राज्यात 20 नोव्हेंबर पासून सुरू होत असलेल्या भारताच्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) 99 टक्के कामे पूर्ण झाले असून केवळ ‘टच ऑफ’ राहिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (गुरुवारी) दिली.
स्थानिक कलाकार आणि कलाकृतींना इफ्फीत स्थान मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘गोवन’ विभागात 7 चित्रपटांची घोषणा केली. यावेळी गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्षा आमदार दिलायला लोबो आणि सीईओ अंकिता शर्मा उपस्थित होत्या.
राज्यात ‘इफ्फी’च्या रूपाने जगातला निवडक मोठ्या चित्रपट महोत्सवाचे आयोजन होते. हा आशिया खंडातील सर्वात जुना महोत्सव आहे.
यासाठी सर्व कामे पूर्णत्वाकडे आली असून स्मार्ट सिटी, सार्वजनिक बांधकाम खात्यासह ‘ईएसजी’ ची सर्व कामे पूर्ण होत आली आहेत. यंदा या महोत्सवात 198 आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे प्रदर्शन होईल.
चित्रपटांचे प्रदर्शन होईल. यात मिरामार, हणजूण पार्किंग आणि रवींद्र भवन मडगाव या ठिकाणांचा समावेश आहे. यंदा ‘सर्वांसाठी इफ्फी या घोषणेनुसार सर्व लोकांना ‘इफ्फी’ अनुभवता यावी यासाठी ईएसजी च्या वतीने विशेष प्रयत्न केले आहेत.
कला अकादमीमध्ये यंदा चित्रपटांचे प्रदर्शन होणार नसले तरी मास्टर क्लास आणि इतर चर्चा, संवाद सत्रे होतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.