पश्चिम महाराष्ट्रात ‘हनी ट्रॅप’ रॅकेट; कराडात पोलिसांच्या कारवाईवर साशंकता…
'राष्ट्रमत'च्या दणक्यानंतर 'त्या' आश्रम चालक महिलेवर कारवाई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सेक्स स्कँडल उघडकीस आल्याने महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. वढेच नव्हे तर आश्रमात आश्रय देण्याच्या नावाखाली ही महिला महिलांना वेश्याव्यवसायात ओढत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणल्यानंतर कराड पोलिसांनी कारवाई करत संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
दरम्यान, तक्रारदार महिलेने धक्कादायक खुलासे करत या ठिकाणी हनी ट्रॅप च्या माध्यमातून अनेकांना गंडा घालून फसवल्याची माहिती सांगितली आहे. एका ऑडिओ क्लिप मध्ये ही महिला एका पोस्को गुन्ह्यात एका युवकाला अडकून पैसे किती घ्यायचे? ते साडेतीन लाख म्हणतात यावर (तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सदर व्यक्ती पोलिस असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र राष्ट्रमत याची खात्री देऊ शकत नाही. ) कथित पोलिस पाच लाख मागा त्या पेक्षा कमी घेऊ नका असं सांगत आहे , ते कुठं रेकॉर्ड करतील मोबाईल घराबाहेर ठेवून यायला सांगा आणि त्याचं तुम्ही व्हिडिओ करा असा सल्ला देत आहे, एवढेच नव्हे तर दुसऱ्या ऑडिओ क्लिप मध्ये एक महिला त्या आश्रम चालक महिलेस कोर्टात दुसऱ्या बिल्डिंग मध्ये तुम्ही सांगितले तेवढे पैसे आणले असल्याचे सांगत असून नेण्यासाठी बोलवत आहे. एवढेच नव्हे तर आश्रम चालक महिला तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीर सुखाची चटक लावून अनेकांना देशोधडीला लावलं असल्याचे ऑडिओतून समजते .
खरंतर या महिलेचे एका राजकीय पक्षाशी संबंध असल्याचे ती महिला सांगत असून, पोलिस आपल्या हातात असल्याचे सांगत आहे यामुळे पोलिसांच्या कारवाईवर लोकांना साशंकता निर्माण झाली आहे. गेली अनेक वर्षे एवढ्या मोठ्या प्रमाणात सेक्स रॅकेट, हनी ट्रेप आणि आश्रमात आश्रय देण्याच्या नावाखाली अनेक महिलांना वेश्याव्यवसायाला भाग पाडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने पोलिस नेमकं करतायंत काय असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेनंतर कराड परिसरात ‘चौकीदार ही चोर है’ असा सूर ऐकायला मिळत आहे . आता या प्रकरणात पुढं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.