google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

Sony India ने लाँच केले WF-C510 Truly Wireless Earbuds

Sony India ने आज WF-C510 या वायरलेस इयरबड्सची घोषणा केली आहे, ज्यात Sony ची ओळख असलेला दमदार आवाज कॉम्पॅक्ट डिझाइनमध्ये उपलब्ध आहे. शक्तिशाली बॅटरी, आरामदायी रचना यासह परवडणाऱ्या किमतीत वाढीव वैशिष्ट्यांसह हे इयरबड्स उपलब्ध होतील. यामुळे दिवसभर तुम्हाला काहीही ऐकायचे असेल, तर हा अत्यंत योग्य पर्याय आहे. निळा, पिवळा, काळा किंवा पांढऱ्या रंगांच्या पर्यायासोबतच आपण आपल्याला हवा असलेला रंग घेऊ शकतो.

यापूर्वीच्या उत्पादनांच्या तुलनेत लहान आणि अधिक कॉम्पॅक्ट डिझाइनसह, WF-C510 हे ग्राहकासाठी अत्यंत सोयीचे आहे. WF-C510 हे Sony चे आतापर्यंतचे सर्वात लहान इयरबड्स आहेत, त्यामुळे लहान कान असलेल्यांनाही ते सोयीचे ठरू शकतात. WF-C510 इअरबड्स कानात अधिक व्यवस्थित बसण्यासाठी त्यात एक अनोखी व्यवस्था करण्यात आली आहे. अर्गोनॉमिक पृष्ठभाग डिझाइनसह मानवी कानाशी पूर्णपणे जुळणारा आकार यासाठी तयार करण्यात आला आहे. इयरबड्समध्ये गोलाकार डिझाइन आणि अतिरिक्त आरामासाठी मॅट फिनिशही आहे, तसेच त्याचा वापर सहज, सोप्या पद्धतीने करता यावा, यासाठी एक सपाट आणि विस्तीर्ण पृष्ठभाग बटणही आहे, ज्यायोगे तुम्ही तुमच्या आवडीचे संगीत विनाअडथळा ऐकू शकाल. 

लहान इअरबड्ससह एक लहान चार्जिंग केसही येते. या कॉम्पॅक्ट दंडगोलाकार चार्जिंग केसमध्ये आधीच्या मॉडेलच्या तुलनेत बारीक डिझाइन आहे, जे खिशात किंवा बॅगमध्ये घेऊन जाणे अधिक सोईस्कर ठरते, ज्यामुळे तुम्ही कुठेही जाल, तिथे इअरबड्स घेऊन जाऊ शकता. इअरबड्सचे 11 तास आणि आणखी 11 तासांपर्यंत दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरी लाइफसह, तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ गाण्यांचा आनंद घेऊ शकता, तसेच 5 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगमुळे तुम्हाला आणखी तासभराचा वेळ मिळेल, याची खात्री करून तुम्ही दिवसभर संगीताचा आनंद घेऊ शकता.

Sony च्या मल्टीपॉइंट कनेक्शनशी WF-C510 सुसंगत आहे, जे तुम्हाला एकाच वेळी दोन Bluetooth® डिव्हाइसेसशी कनेक्ट करू देते. IPX4 वॉटर रेझिस्टन्स रेटिंगसह, इअरबड्सवर पाणी पडल्यास किंवा घाम आल्यास त्याचे नुकसान होत नाही, तसेच विविध परिस्थितींमध्ये टिकाऊपणा टिकवून ठेवतात. ‘क्विक ॲक्सेस’सह तुम्ही Spotify टॅप सहजपणे ऑपरेट करू शकता आणि तुम्हाला तुमच्या आवडत्या ट्युन वाजविणे सोपे जाते. फास्ट पेअर आणि स्विफ्ट पेअरसह तुमच्या डिव्हाइससोबत WF-C510 सहजपणे जोडले जाऊ शकते. या व्यतिरिक्त चार्जिंग केसमधून काढून टाकल्यानंतर तुम्ही डावा किंवा उजवा इयरबड स्वतंत्रपणे वापरू शकता, ज्यामुळे ते मल्टिटास्किंगसाठी उपयुक्त ठरतात.

इअरबड्समध्ये ॲम्बियंट साउंड मोड आहे, जो तुम्ही काहीही ऐकत असताना तुमच्या सभोवतालचा आवाज तुम्हाला ऐकू देतो. तुम्ही चालत असाल, प्रवास करत असाल किंवा व्यायाम करत असाल, तरीही हा मोड तुमच्या संगीत अनुभवात व्यत्यय न आणता सभोवतालच्या जगाशी तुमचा कनेक्ट राहण्याची खात्री देतो. या व्यतिरिक्त “व्हॉइस फोकस” फंक्शन आहे, जे सुरू केल्यास WF-C510 मध्ये इतर आवाज कमी होऊन, केवळ मानवी आवाजच कॅप्चर होतो. तुम्ही Sony | हेडफोन कनेक्ट ॲपमध्ये जात हे आवाज सेटिंग्ज वैयक्तिकृत करू शकता. आकार कॉम्पॅक्ट असला, तरी WF-C510 इअरबड्स आवाजाच्या गुणवत्तेशी तडजोड करत नाहीत. यासाठी DSEE (डिजिटल साउंड एन्हांसमेंट इंजिन) चे आभार, ते उच्च-गुणवत्तेच्या ध्वनीची सोय करतात आणि ऐकण्याचा अविस्मरणीय अनुभव देतात. कमी ते उच्च फ्रिक्वेन्सीमध्ये सु-संतुलित ध्वनी ट्युनिंगसह, स्वर नैसर्गिक आणि स्पष्ट असतील, याची काळजी घेतली जाते. या व्यतिरिक्त ऐकण्याच्या अनुभवासाठी तुम्ही इमर्सिव्ह 360 रिॲलिटी ऑडिओचा आनंद घेऊ शकता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!