रजनीकांत यांची प्रकृती बिघडली, इलेक्टिव प्रोसिजर होणार?
प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून सर्जरी करावी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रजनीकांत यांच्यावर मंगळवारी इलेक्टिव प्रोसिजर होण्याची शक्यता आहे.
रुग्णालयाकडून किंवा कुटुंबियांकडून या वृत्तावर दुजोरा मिळाला नाही. मात्र लवकरच रजनीकांत यांच्या हेल्थबाबत रुग्णालयाकडून अपडेट जारी केली जाण्याची शक्यता आहे. रजनीकांत यांच्या पत्नी लतादीदींनी दिलेल्या निवेदनात सुपरस्टारच्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे. सध्या रजनीकांत यांची प्रकृती स्थिर आहे.
काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आलं होतं. अलीकडेच त्यांनी प्रकृतीचे कारण सांगून राजकारणातून निवृत्ती घेतली होती. राजनीकांत यांच्या प्रकृतीची अपडेट कळताच चाहत्यांची चिंता वाढली आहे. लवकर बरं होण्यासाठी सोशल मीडियावरुन चाहते प्रार्थना करत आहेत. रजनीकांत सध्या दोन चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत.