google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जगमहाराष्ट्र

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एसआरए प्रकल्पाच्या वादातून ही घटना घडल्याचे बोललं जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली. यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

सिद्दीकी यांच्यावर आज (१२ ऑक्टोबर) रात्री 9.15 च्या सुमारास गोळीबार झाला. वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. निर्मल नगर भागात फटाके वाजत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला होता. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर झाले होते. यातील एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागली.

या घटनेनंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त समजताच त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी तातडीने लिलावती रुग्णालयात धाव घेतली. तसेच अभिनेता संजय दत्त ही लिलावती रुग्णालयात झाला होता. त्यासोबतच राष्ट्रवादीचे अनेक नेतेही लिलावती रुग्णालयात दाखल होत आहे.


बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळच हा गोळीबाराचा प्रकार घडला. बाबा सिद्दीकी यांच्यासोबत असलेल्या एका सहकाऱ्याच्या पायाला गोळी लागली. त्याचा एक व्हिडीओही समोर आला होता. बाबा सिद्दीकी यांना १५ दिवसांपूर्वी धमकीही आली होती.

बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूची माहिती मिळताच अनेक कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोर गर्दी केली. नुकतंच आशिष शेलार यांनी लिलावती रुग्णालयात भेट दिली. बाबा सिद्धिकी हे आमदार झिशान सिद्धिकी यांचे वडील आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी देखील ते उपस्थित होते.


बाबा सिद्दिकी यांचा जन्म 30 सप्टेंबर 1958 ला झाला. त्यांनी बीकॉमपपर्यंत शिक्षण घेतले होते. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. सिद्दिकी यांनी वयाच्या 16-17 व्या वर्षापासूनच कॉंग्रेस पक्षातून राजकीय प्रवास सुरु केला होता. सुरुवातीला ते मुंबई प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सदस्य राहिले. बाबा सिद्दीकी यांनी 1999 साली वांद्रे पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि ते पहिल्यांदा विजयी झाले. यानंतर 1999, 2004, 2009 असे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. नोव्हेंबर 2004 ते डिसेंबर 2008 या काळात ते कामगार, अन्न नागरी पुरवठा आणि अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री होते. बाबा सिद्दीकी यांचा 2014 मध्ये भाजप नेते आशिष शेलार यांनी पराभव केला होता.

बाबा सिद्दिकी हे 15 वर्षं वांद्रे पश्चिममधून आमदार होते. त्यामुळ अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत त्यांचे जवळचे संबंध होते. सलमान खान पासून संजय दत्त पर्यंत अनेक त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत होते. दरवर्षी ते रमझान महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन करायचे. या पार्टीला सेलिब्रिटी हजेरी लावायचे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!