google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

अक्षय कुमारला पुन्हा झाला कोरोना

मुंबई:

अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) कोरोनाची लागण झाली आहे. खिलाडी कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे अक्षय कुमार कान्स चित्रपट महोत्सावात हजेरी लावणार नाही. अक्षय कुमारने ट्वीट करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.

अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. अक्षय पोस्ट शेअर करत लिहिले आहे,”माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने मी कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होऊ शकत नाही. याचं मला खूप वाईट वाटत आहे. पण कान्स चित्रपट महोत्सावाला माझ्या शुभेच्छा आहेत.” ही पोस्ट अक्षयने अनुराग ठाकूरला टॅग केली आहे.



अक्षय कुमारला याआधीदेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी अक्षय ‘राम सेतु’ सिनेमाचे शूटिंग करत होता. अक्षय कुमार आणि चित्रीकरणाशी संबंधित 45 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे चित्रीकरणदेखील थांबवले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!