google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

रेखा काय म्हणतेय, ‘गुम है किसी के प्यार में’ मध्ये?

स्टारप्लसचा शो ‘गुम हैं किसी के प्यार में’ ही एक क्लासिक मालिका आहे आणि केवळ जुनी पिढीच नव्हे तर तरुण पिढीत देखील ही मालिका चर्चेचा विषय असते. या मालिकेच्या वेधक आणि सुंदर कथेने आणि यातील दिलखेचक नाट्याने त्यांना टेलिव्हिजन स्क्रीनवर खिळवून ठेवले आहे. आता ज्येष्ठ अभिनेत्री रेखा स्टार प्लसच्या या मालिकेसाठीच्या खास प्रोमोमध्ये विशेष भूमिका साकारणार आहेत. स्टार प्लस आणि या मालिकेच्या निमित्ताने ती तिसऱ्यांदा प्रेक्षकांसमोर येणार आहे.


बॉलीवूडमधील कालातीत सौंदर्य म्हणजे अभिनेत्री रेखा. रेखा या आधी देखील स्टारप्लस आणि गुम है किसी के प्यार के सोबत जोडली गेली होती आणि या निमित्ताने प्रेक्षक जेव्हा तिला पुन्हा एकदा टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतील तेव्हा ते तिच्या व्यक्तिमत्त्वाने आणि तिच्या कालातीत सौंदर्याने पुन्हा एकदा मंत्रमुग्ध होतील.


‘गुम है किसी के प्यार’ या मालिकेशी अगदी सुरुवातीपासूनच रेखाचे अगदी खास संबंध राहिले आहेत. गतकाळातील ही सुंदर अभिनेत्री या मालिकेच्या संबंधातली आपली खास उपस्थिती दर्शवण्यासाठी सज्ज आहे आणि तिच्या या खास पदार्पणासाठी, तिचे चाहते अतिशय उत्सुक आहेत.


‘गुम है किसी के प्यार में’ ही मालिका आता एका रंजक वळणावर आहे आणि यानिमित्ताने रेखा मालिकेतील नव्या कलाकारांची ओळख करून देणार आहे. या मालिकेचा एक समृद्ध वारसा आहे आणि सई आणि विराटच्या या वारशाची ओळख करून देण्यासाठी दिग्गज अभिनेत्री रेखाशिवाय आणखी कोण असू शकेल?


सदाबहार रेखा ‘गुम हैं किसके प्यार में’ द्वारे टेलिव्हिजनवर येत असून प्रेक्षक तिच्या सौंदर्याने पुन्हा एकदा मंत्रमुग्ध होतील.


‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेची निर्मिती राजेश राम सिंग, पिया बाजपेयी, प्रदीप कुमार आणि शायका परवीन यांनी केली आहे. ही मालिका सोमवार ते रविवार रात्री ८ वाजता स्टारप्लसवर प्रसारित होईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!