नेटफ्लिक्सच्या ‘टेकटेन’ या क्रिएटीव्ह कलाकारांना चित्रपट बनविण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या प्रकल्पात गोव्यातील बरखा नाईक आणि सुयश कामत या तरुण कलाकारांची निवड झाली आहे. भारतातील दहा होतकरू कलाकारांची या प्रकल्पासाठी निवड झाली आहे त्यात दोन गोमंतकीय आहेत.
नेटफ्लिक्सच्या शिबिरांमध्ये सहभागी होण्यासह लघुपट बनविण्यासाठी १० हजार डॉलरचे अनुदान देण्याची तरतूद नेटफ्लिक्सच्या या योजनेत आहे. या योजनेसाठी देशभरातून आलेल्या अर्जांमधून अंतिम दहा उमेदवारांची निवड केली आहे. नेटफ्लिक्स फंड फॉर क्रिएटीव्ह इक्वीटी आणि फिल्म कम्पानियन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवला जात आहे. नव्या पिढीतील चांगल्या कलाकारांना शोधण्याचा हा प्रकल्प आहे. यात निवडल्या जाणाऱ्या कलाकारांना शिबिरात सहभागी होण्यासह त्यांना लघुपट बनविण्यासाठी अनुदान देण्यात येते.
आदिती शर्मा, बरखा नाईक, हितार्थ देसाई, मनस्वीनी बुवरहन, मुरली क्रिष्णन, रोहन चौधरी, रिया नलावडे, समिहा सबनीस, संदीप अन्बूसेल्वन आणि सुयश कामत या दहा जणांची यासाठी निवड झाली आहे.