गोवा
‘गालजीबाग येथील ’ते’ झाड हटवा’
काणकोण :
गालजीबाग शाळेजवळील वाळलेले झाड आपत्कालीन व्यवस्थापनाने तत्काळ हटवावे तसेच माताश्री हॅटिलजवळील राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातावर उपाययोजना करावी, अशी मागणी काँग्रेसचे ससचिटणीस जनार्दन भंडारी यांनी या भागाला भेट दिल्यावेळी केली.
भंडारी यांनी सोमवारी विविध खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत या भागाला भेट दिली. यावेळी राष्टीय महामार्गाचे. सहाय्यक गालजीबाग येथील रोहिदास गावकर, काँग्रेस पक्षाचे प्रलय भगत, गास्पार कुतिन्हो, महिला मोर्चा अध्यक्ष, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र नाईक, वैष्णव पेडणेकर, सिद्धार्थ उपस्थित होते.