इराणसोबत व्यापार करणाऱ्या ‘या’ 3 भारतीय कंपन्यांवर बंदी
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे, इस्त्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षानेही अवघ्या जगाला चिंतेत टाकले आहे. यादरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणसोबत व्यापार करणाऱ्या डझनहून अधिक कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत, यामध्ये तीन भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे.
या कंपन्यांवर युक्रेन युद्धासाठी इराणच्या वतीने रशियाला ड्रोन पाठवल्याचा आरोप आहे. त्यांनी या करारात मदत केली होती. अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटचे म्हणणे आहे की, आम्हाला तपासात असे आढळून आले की या कंपन्यांनी इराणसोबतच्या करारात रशियाला मदत केली होती. यूएस विभागाच्या म्हणण्यानुसार, या डीलमधील मुख्य कंपनी सहारा थंडर होती, जिने इराणचे ड्रोन इतर देशांना विकण्यात मदत केली होती.
दरम्यान, या करारात सहारा थंडरला मदत केल्याचा आरोप जेन शिपिंग, पोर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सी आर्ट शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या तीन भारतीय कंपन्यांवर करण्यात आला आहे. अमेरिकन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, इराणी लष्करी युनिट सहारा थंडर ही एक शिपिंग नेटवर्क असलेली कंपनी आहे. ही इराणच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (पीआरसी), रशिया (Russia), व्हेनेझुएलासह अनेक देशांना इराणी कमोडिटीज विकते (MODAFL).
दुसरीकडे, सहारा थंडरने भारतस्थित झेन शिपिंग आणि पोर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत कुक आयलंड्स-ध्वजांकित जहाज CHEM (IMO 9240914 साठी टाइम चार्टर करार केला. हे UAE स्थित Safe Seas Ship Management FZE द्वारे व्यवस्थापित आणि चालवले जाते. सहारा थंडरने 2022 पर्यंत कमोडिटीजची अनेक शिपमेंट पाठवण्यासाठी CHEM चा वापर केला आहे, असे अमेरिकन ट्रेझरी डिपार्टमेंटने सांगितले. इराणस्थित अरसांग सेफ ट्रेडिंग कंपनीने CHEM सह सहारा थंडरशी संबंधित अनेक जहाज वाहतुकीमध्ये सेवा प्रदान केली आहे.
अमेरिकन ट्रेझरी डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार, इराणस्थित (Iran) आशिया मरीन क्राउन एजन्सीने इराणच्या अब्बास बंदरात सहारा थंडर शिपमेंटमध्ये पोर्ट एजंट म्हणून काम केले. त्यांनी पुढे सांगितले की, ‘भारतस्थित सी आर्टशिप मॅनेजमेंट (OPC) प्रायव्हेट लिमिटेड आणि UAE-स्थित कंपनी ट्रान्स गल्फ एजन्सी एलएलसी यांनी सहारा थंडरच्या समर्थनार्थ जहाजांचे व्यवस्थापन करण्यासाठी सहकार्य केले. या बदल्यात यूएई आणि इराण स्थित कोरल ट्रेडिंग ईएसटीने सहारा थंडरकडून इराणी कमोडिटीज खरेदी केल्या आहेत.