google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

होय! आम्ही घटना दुरुस्ती  करणार – युरी आलेमाव

मडगाव :

आम्ही भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीमध्ये सुधारणा करू आणि पक्षांतर (ज्या मूळ पक्षावर आमदार किंवा खासदार निवडून आले होते ते त्या पक्षाला सोडून गेल्यास) करणाऱ्यांची विधानसभा किंवा संसद सदस्यत्वाची तात्काळ अपात्रता करू. काँग्रेसच्या या वचनबद्धतेमुळे भाजप नेते विनोद तावडे घाबरले आहेत असा पलटवार युरी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.


विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या काँग्रेस राज्यघटना बदलणार असल्याचा वक्तव्याचा  निषेध केला व भाजप खोटी माहिती पसरवीत असल्याचा आरोप केला. संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस वचनबद्ध आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.


ज्यांनी अनेक राज्यांत पक्षांतरे करुन सत्ता हातात घेतली त्या भाजपनेच घटनेचा खून केला.  भाजपकडून आम्हाला संविधानाचे धडे नको आहेत. संविधानाचा अनादर करणारे भाजप नेतेच आहेत, असे युरी आलेमाव म्हणाले.


भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी संविधानावर बोलताना दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, मायकल लोबो, संकल्प आमोणकर आणि इतर चार पक्षबदलू आमदारांसह पत्रकार परिषदेला संबोधित करायला हवे होते, असा टोला युरी आलेमाव यांनी हाणला.


भाजपने गेल्या दहा वर्षांत पक्षांतरांना प्रोत्साहन देऊन लोकशाही पद्धतीने निवडून आलेली अनेक सरकारे उलथून टाकली आहेत. त्यांनी मडगाव नगरपालीकेत यापूर्वी दारुण पराभव झालेल्या नगराध्यक्षास परत  निवडून आणण्यासाठी नगरपालिकेच्या कायद्यात दुरुस्ती केली, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.


भाजप आता चिंतेत आहे कारण जून 2024 मध्ये इंडिया आघाडी सरकार सत्तेवर येणार हे निश्चित आहे. आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या राज्यांमध्ये भाजपने मागच्या दाराने सत्ता काबीज केली ती सर्व सरकारे कोसळणार आहेत. गोव्यातही नवीन सरकार येईल असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!